शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

Kolhapur: दूधगंगा धरण दुरुस्तीसाठी ८१ कोटी मिळणार तरी कधी? राजकीय ताकद गरजेची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 13:20 IST

कामासाठी नवे वर्ष उजाडणार

कोल्हापूर : नेतेमंडळींच्या आरोपामुळे चर्चेत आलेल्या दूधगंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीचा ८१ कोटींचा प्रस्ताव अजूनही अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. आता हा प्रस्ताव वित्तीय मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव लगेच मंजूर झाला तरी प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजकीय ताकद वापरून मंजुरीसाठी प्रयत्न न केल्यास तो असाच फिरत राहणार आहे.दुरुस्तीच्या नावाखाली या धरणातून साडेसात टीएमसी पाणी आधीच सोडण्यात आले आणि प्रत्यक्षात दुरुस्तीही करण्यात आली नाही, असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. त्यानंतर याबाबतची अधिक माहिती घेतली असता या दुरुस्तीच्या प्रस्तावाला अजूनही मंजुरी मिळालेली नाही.पाटबंधारे विभागाचे पुण्याचे मुख्य अभियंता एप्रिल २०२२ मध्ये या धरणाला भेट दिली होती. त्यावेळी या धरणातून होणारी गळती पाहिल्यानंतर त्यांनी धरणाच्या सुरक्षिततेसाठी पाणीसाठा कमी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार कोल्हापूरच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी धरणाची सुरक्षितता विचारात घेऊन पाणी सोडले. दरम्यान, यंदा पाऊसच लांबल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न काही दिवसांसाठी गंभीर झाला आणि त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.मुळात धरणाची दुरुस्ती एका दिवसात करता येत नाही. त्यासाठीच्या प्रस्तावाला आधी मान्यता मिळणे आवश्यक असते. ८१ कोटी रुपयांचा हा दुरुस्तीचा प्रस्ताव एप्रिलमध्येच कोल्हापूर मंडळ कार्यालय, पुणे कार्यालय, नंतर राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीनेही मंजूर केला आहे. यानंतर हा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडे पाठविण्यात आला. या विभागाच्या शिफारशीनंतर आता अंतिम मान्यतेसाठी तो वित्त विभागाकडे पाठविण्यात आला.वित्त विभागाने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर मग या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळणार आहे. जरी आता हा प्रस्ताव मंजूर झाला तरी त्याची राज्यस्तरीय निविदा काढण्यासाठीही वेळ लागणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया सुरू होऊन प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी नवे वर्ष उजाडणार आहे.

पाणी उतरेल तसे कामधरणातून जसजशी पाण्याची पातळी कमी होत जाईल तसतसे दुरुस्तीचे काम सुरू करावे लागते. त्यामुळे या वर्षाखेरीस सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणGovernmentसरकार