शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री गट, भाजपला ८० टक्के निधी, मग आम्ही काय करायचे..? काँग्रेसच्या आमदारांची विचारणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 18:23 IST

कोल्हापूर : मुख्यमंत्री गट व भाजपच्या आमदारांना ८० टक्के निधी दिल्यावर आम्ही कशी विकासकामे करायची अशी विचारणा काँग्रेसच्या चार ...

कोल्हापूर : मुख्यमंत्री गट व भाजपच्या आमदारांना ८० टक्के निधी दिल्यावर आम्ही कशी विकासकामे करायची अशी विचारणा काँग्रेसच्या चार आमदारांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे मंगळवारी केली. शेजारच्या जिल्ह्यात निधीचे वाटप झाले असून, कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप याबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याचे शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. निधी वाटपाबाबत अद्याप कोणतेही सूत्र ठरलेले नसून, आपली मागणी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासन जिल्हाधिकारी रेखावर यांनी शिष्टमंडळाला दिले.या शिष्टमंडळात आमदार सर्वश्री ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव,राजूबाबा आवळे यांचा समावेश होता. ही बाब पालकमंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून द्यावी व आमदारांना समान पद्धतीने वाटप होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना दरवर्षी निधी देण्यात येतो. हा निधी वाटप करत असताना सर्व लोकप्रतिनिधींना समान पद्धतीने निधी वाटप होणे अपेक्षित असते; पण यावेळी निधी वाटप करत असताना वेगळे सूत्र अवलंबिण्यात येणार असल्याचे आम्हाला समजले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे गट ४० टक्के, भाजप ४० टक्के, पालकमंत्री १० टक्के व उर्वरित १० टक्के निधी विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सहा, तर राष्ट्रवादीचे दोन असे विरोधी पक्षाचे एकूण आठ आमदार आहेत. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. जर या सूत्रानुसार निधी वाटप केला तर ९० टक्के निधी हा दोन आमदार असलेल्या गटांना आणि केवळ दहा टक्के निधी हा आठ आमदार असलेल्या विरोधी गटाला मिळेल. ही गोष्ट विरोधी पक्षातील आमदारांवर अन्यायकारक ठरेल. त्यामुळे विकासकामे कशी करायची, हा प्रश्न निर्माण होतो. याचा गांभीर्याने विचार व्हावा.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMLAआमदारcongressकाँग्रेस