शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन चोरट्यांकडून ८ लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

By सचिन भोसले | Updated: October 14, 2022 20:09 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास, तर क्रेनच्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली आहे.

कोल्हापूर- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी मोटारसायकल चोरीप्रकरणी एकास, तर क्रेनच्या चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून चौकशीत एक दुचाकी व दोन ठिकाणावरून क्रेनचे साहित्य असा ८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इजाज दिलावर शेख (रा. एम.एस.ई.बी ऑफीसजवळ, यादवनगर), सद्दामहुसेन मुक्तारआलम शेख (वय २४), मुक्तारआलम झाकीरहुसेन शेख (५३, दोघे रा. बाळुमामा मंदीराजवळ, एकता काॅलनी, माळवाडी, पुलाची शिरोली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे गोपनिय बातमीदाराकडून अंमलदार सुरेश पाटील यांना संशयित इजाज शेख हा चोरीची दुचाकी विकण्यासाठी सदरबाजारात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून एक मोपेड मिळून आली. आणखी चौकशी करता त्याच्याकडून सातारा येथून चोरलेली ७५ हजार किंमतीची मोपेड मिळून आली. 

तपासादरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून क्रेन चोरून तो स्क्रॅप केली असून त्या क्रेनचे काही पार्ट शिरोली एमआयडीसीत गॅरेजमध्ये आहेत. अशी माहिती मिळाल्याने उपनिरीक्षक विनायक सपाटे, शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रणजित पाटील, असिफ कलायगर, प्रशांत कांबळे, विनोद कांबळे या पथकाने शिरोली एमआयडीसीतून सद्दामहुसेन शेख यांचे पोकलॅन गॅरेजवर जाऊन खात्री केली. त्यात गॅरेजवर क्रेनचे इंजिन, हायड्रोलिक मोटर, बुम सिलेंडर दोन नग, टायरसह ८ व्हील असे साहित्य मिळून आले. पंधरा दिवसांपूर्वी उद्यमनगरातून क्रेन चोरून तो स्क्रॅप केल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून सद्दामहुसेन शेख, मुक्तारअलम शेख यांना अटक केली. चोरीकरीता वापरलेले वाहन असे एकूण ७ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर