शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

सलग ३७ व्या रविवारी स्वच्छता मोहीम, १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:00 PM

कोल्हापूर : शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता मोहिमेचा ...

ठळक मुद्दे सलग ३७ व्या रविवारी स्वच्छता मोहीम, १२ टन कचरा व प्लास्टिक गोळाज्येष्ठ नागरिक, युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : शहरामध्ये रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये १२ टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आले. विशेष म्हणजे स्वच्छता मोहिमेचा सलग ३७ वा रविवार आहे. या अभियानामध्ये शहरातील ज्येष्ठ नागरिक, शिवाजी विद्यापीठ डिपार्टमेंटआॅफ टेक्नॉलॉजी, विवेकानंद कॉलेज विद्यार्थी, वृक्षप्रेमी संघटना, स्वरा फौंडेशन, कोल्हापूर शहर परीट समाज, मेनन कंपनीचे कर्मचारी, स्वच्छतादूत अमित देशपांडे उपस्थित होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम झाली.यावेळी आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, गेल्या नऊ महिन्यांपासून सलग स्वच्छता मोहीम सुरू आहे. कोल्हापूरकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे. प्लास्टिकचा वापर करू नका व इतरांनाही करू देऊ नका.

शासनाकडून स्वच्छ भारत अभियानातून स्पर्धा सुरू असून, देशात ५ च्या आत क्रमांक येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत; यासाठी सर्वांनी ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवून ओल्या कचऱ्यापासून घरी खतनिर्मिती करावी. स्वच्छ सर्व्हेक्षणातील जे सात निकष आहेत. त्यामध्ये कोल्हापूर शहरवासीयांनी सहभागी होऊन आपले अभिप्राय द्यावेत. सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा, नागरिकांनी प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा.नर्सरी बागेतील राजर्षी शाहू समाधिस्थळाचे रविवारी लोकार्पण होणार आहे. यावेळी या परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. नगरसेविका सुरेखा शहा, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार, शाखा अभियंता आर. के. पाटील, शिक्षण विभागाचे बाबा साळोखे, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, सर्व आरोग्य निरीक्षक, शशिकांत भालकर, स्वरा फौंडेशनचे आदित्य लातूरकर, व्हाईट आर्मीचे प्रशांत शेंडे, विनायक भाट, प्रेम सातपुते उपस्थित होते.स्वच्छता केलेला परिसररंकाळा तलाव शाहू स्मृती बाग, आयसोलेशन हॉस्पिटल ते शेंडा पार्क, रिलायन्य मॉलमागील परिसर, डायना पार्क येथील ओपन स्पेस, शुक्रवार पेठ गायकवाड वाडानजीक, शिर्के उद्यान, रेल्वे गुड्स, कोटीतीर्थ तलाव, हुतात्मा पार्क या परिसराची तसेच दसरा चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी फायर स्टेशन, डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी शिवाजी विद्यापीठ रोड, उड्डान पूल ते कावळा नाका व कावळा नाका ते तावडे हॉटेल, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा मेनरोड, पापाची तिकटी ते गंगावेश रोडमहापालिकेची यंत्रणा४ जेसीबी, ५ डंपर, ६ आरसी गाड्या व महापालिकेचे १४0 स्वच्छता कर्मचारी.

 

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर