शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

राज्यातील १३ लाख यंत्रमागधारकांना ७०० कोटींची वीज सवलत, सहा वर्षांनंतर मिळाला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 17:25 IST

इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना १५ कोटींचा फायदा

इचलकरंजी : राज्यातील साध्या आणि अत्याधुनिक यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ८ मार्चला कोरोची (ता. हातकणंगले) येथे केलेल्या घोषणेची पूर्तता केली. या निर्णयामुळे राज्यातील तेरा लाख यंत्रमाग उद्योजकांना सुमारे ७०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. त्यामुळे यंत्रमागधारकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.गेल्या सहा वर्षांपासून यंत्रमागाला विजेमध्ये सवलत देण्याची मागणी राज्यातील सर्वच यंत्रमागधारकांकडून करण्यात येत होती. त्यासंदर्भात माजी वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नव्हती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साध्या व अत्याधुनिक यंत्रमागांना अतिरिक्त वीज सवलत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.२७ अश्वशक्तीपेक्षा जास्त, पण २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट ७५ पैसे अतिरिक्त वीज सवलत देण्यात येईल. २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना प्रतियुनिट १ रुपये अतिरिक्त वीज सवलत लागू करण्यात येईल. ही वीज सवलत मिळण्यासाठी २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमागांना तसेच २७ अश्वशक्तीपेक्षा जास्त परंतु २०१ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या यंत्रमाग उद्योगांना वस्त्रोद्योग विभागाकडे नोंदणी करावी लागेल व ज्यांना मान्यता मिळेल, अशा उद्योगांना ही सवलत लागू राहील. राज्य सरकारने जाहीर केलेल्या सन २०२३ ते २०२८ या वस्त्रोद्योग धोरणाच्या कालावधीमध्ये ही सवलत लागू असणार आहे.१३ लाख यंत्रमागांना फायदाराज्यामध्ये बारा ते तेरा लाख साधे यंत्रमाग आहेत, तर २५ ते ३० हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. साध्या यंत्रमागाला दरमहा २५० युनिट, तर अत्याधुनिक यंत्रमागाला दरमहा ४०० युनिट वीज लागते. सरकारने जाहीर केलेल्या या निर्णयामुळे यंत्रमागधारकांना सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.इचलकरंजीतील यंत्रमागधारकांना १५ कोटींचा फायदाइचलकरंजी शहरामध्ये ८० ते ८५ साधे यंत्रमाग, तर १५ ते २० हजार अत्याधुनिक यंत्रमाग आहेत. साध्या यंत्रमागाला दरमहा अडीच कोटी रुपये, तर अत्याधुनिक यंत्रमागाला १२ ते १३ कोटी रुपये असा दरमहा सुमारे १५ कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीज