शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election Voting 2026: इचलकरंजीत दोन तासात ७.८८ टक्के मतदान; डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी, पोलिसांनी जमावाला पांगवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 11:49 IST

नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी जमल्याने पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले

इचलकरंजी: महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी शहरातील ३०२ मतदान केंद्रांवर सकाळी ७.३० वाजता उत्साहात मतदानास सुरुवात झाली. १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी मतदान होत आहे. काही ठिकाणी सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. पहिल्या दोन तासांमध्ये ७.८८ टक्के मतदान झाले.

इचलकरंजीतील गर्ल्स हायस्कूल मधील एका केंद्रावर एका विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास सांगत असल्याचा आरोप झाल्यानंतर मतदान केंद्रातील एका अधिकाऱ्याला पोलिसासमवेत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे नेण्यात आले. याघटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मतदार यादीतील गोंधळ, बूथ क्रमांकांची चूक आणि माहितीअभावी अनेक मतदारांचा गोंधळ उडत आहे. काही ठिकाणी मतदारांना यादीत नाव शोधण्यासाठी बूथवर धावपळ करावी लागत आहे. चार मते द्यायची असल्याने मतदानास वेळ लागत असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिक गोंधळलेले दिसत आहेत.

Kolhapur Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात पहिल्या दोन तासांमध्ये ९.६४ टक्के मतदान नाट्यगृह जवळील डीकेटीई शाळेच्या केंद्रासमोर मोठी गर्दी जमल्याने पोलिसांच्या राखीव तुकडीने तेथे धाव घेत जमावाला पांगवले. मतदान केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Municipal Election 2026: Slow Start, Crowd Control Required

Web Summary : Ichalkaranji's first municipal election saw 7.88% voter turnout in two hours. Confusion arose due to voter list errors, causing delays. Police dispersed a large crowd near DKT school, maintaining order at polling stations.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Votingमतदान