शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘ठिबक’चे ७ कोटींचे अनुदान थकले, दीड वर्षापासून शेतकरी प्रतीक्षेत; कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 12:42 IST

आयुब मुल्ला खोची (जि. कोल्हापूर ) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी ...

आयुब मुल्लाखोची (जि. कोल्हापूर) : ‘ठिबक’च्या अनुदानाची रक्कम आज, उद्या मिळेल असे म्हणत प्रतीक्षेत असलेला जिल्ह्यातील शेतकरी वैतागून गेला आहे. दीड वर्षापूर्वी स्वत:च्या पैशाने शेतात ठिबक संच बसवून शासनाकडे आमचे हक्काचे अनुदान द्या, म्हणायची वेळ आली आहे. अनुदानाची घोषणा शासन करते; पण ते वेळेत देत नाही याचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यांतील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांचे अंदाजे सात कोटींचे अनुदान अद्याप दिलेले नाही. यामध्ये सर्वाधिक शेतकरी हातकणंगले तालुक्यातील आहेत. शासन एकीकडे पाणी वाचवा, ठिबक वापरा असा नारा देते, तर दुसरीकडे अनुदानाची रक्कम वर्ष-दीड वर्ष देत नसेल तर ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय’ अशीच शासनाच्या याेजनांची अवस्था झाली आहे.प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५५ टक्के व मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के अनुदान ठिबकसाठी मिळते. यामुळे अनुदानावर आधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ठिबक संच बसविले.त्यासाठी सर्वप्रथम स्वतःजवळील पैशांची गुंतवणूक केली. कृषी विभागाला माहिती सादर केली. अनुदान तत्काळ मिळेल अशी अपेक्षा ठेवली; परंतु अनुदान मिळण्यास उशीर होत आहे. सुमारे २ हजार ४४५ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संच शेतात बसविले. त्यातील सुमारे ९०० शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी ऑक्टोबरमध्ये अनुदान मिळाले; परंतु १,५४४ शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. ही रक्कम ७ कोटी ५ लाख रुपये आहे. कृषी विभागाकडे चौकशी करून हेलपाटे मारून शेतकरी वैतागला आहे.लॉटरी पद्धतीने निवडलॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड केली जाते. गतवेळचे अनुदान मिळाले नसल्याने यावर्षी लाभार्थी निवड झालेली नाही. विशेष म्हणजे लाभार्थी निवड झाली की लगेच एका महिन्यात ठिबक संच बसवावे लागते. शेतकरी पैशाची जमवाजमव करून संच बसवितो. परंतु, अनुदान वर्षभर मिळत नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीWaterपाणी