वसंतराव जाधव पार्कमध्ये ६९ हजारांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:03+5:302021-06-23T04:17:03+5:30
कोल्हापूर : येथील रामानंदनगरातील वसंतराव जाधव पार्कमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास ...

वसंतराव जाधव पार्कमध्ये ६९ हजारांची घरफोडी
कोल्हापूर : येथील रामानंदनगरातील वसंतराव जाधव पार्कमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे ६९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले, ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. स्वरूप लक्ष्मण अमलझरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलीस ठाण्यात घरफोडीची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वरूप अमलझरे हे व्यवसायाने कर सल्लागार असून वसंतराव जाधव पार्कमध्ये राहतात. रविवारी दुपारी ते सहकुटूंब सासरवाडीला गेले होते. सोमवारी सायंकाळी ते घरी परतले. त्यावेळी त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी तोडून आतील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरुन नेले. याबाबत अमलझरे यांनी, घरातील १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे ६८ हजार ८०० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिली.