शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
5
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
6
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
7
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
8
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
9
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
10
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
11
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
12
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
13
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
14
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
15
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
16
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
17
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
18
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
19
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
20
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?

Kolhapur: दामदुपटीच्या आमिषाने ६५ कोटींनी गंडवले; दोन कंपन्यांविरूद्ध तक्रार

By उद्धव गोडसे | Updated: April 26, 2024 12:07 IST

सेन्स ऑप्शन, ब्रेनवेझ टेक्नॉलॉजीने फसवले : आमशी येथील संशयित

उद्धव गोडसेकोल्हापूर : गुंतवणुकीवर पाच महिन्यांत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून राजारामपुरी येथील सेन्स ऑप्शन आणि ब्रेनवेझ टेक्नॉलॉजी या दोन कंपन्यांनी सुमारे ६५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. गुंतवणूकदारांनी याबाबतची तक्रार गुरुवारी (दि. २५) पोलिस अधीक्षक कार्यालयात दिली. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता तक्रारदारांनी वर्तवली. फसवणूक करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांचा सध्या पुण्यात मुक्काम असल्याची माहिती गुंतवणूकदारांनी दिली. आमशीमध्ये दामदुप्पटचा भुलभुल्लया अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने दीड वर्षापूर्वी दिले होते.विविध प्रकारची आमिषे दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांचे कारनामे उघडकीस येत असतानाही, गुंतवणूकदार डोळे झाकून कंपन्यांमध्ये पैसे जमा करत आहेत. संदीप बाजीराव पाटील (रा. आमशी, ता. करवीर) आणि त्याचा मेहुणा सुदाम सदाशिव चव्हाण (रा. सांगरूळ, ता. करवीर) या दोघांनी २०२१ मध्ये राजारामपुरी येथील जनता बाजार चौकातील एका इमारतीत सेन्स ऑप्शन आणि ब्रेनवेझ टेक्नॉलॉजी नावाच्या दोन ट्रेडिंग कंपन्या सुरू केल्या. शेअर मार्केटमधील ट्रेडिंगमधून दरमहा २० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत त्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित केले. सुरुवातीचे काही महिने २० टक्के परतावा मिळाल्याने हुरळून गेलेल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या रकमा कंपनीत जमा केल्या. काही जणांनी जमिनी आणि दागिने विकून कंपनीत पैसे भरले. मात्र, जून २०२२ पासून परतावा मिळणे बंद झाले. कंपनीच्या कारभाराबद्दल संशय आल्याने काही गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली. मात्र, दोन्ही प्रमुखांनी राजारामपुरीतील कार्यालय बंद करून पुण्याला पलायन केले. कोट्यवधी रुपये अडकल्यामुळे काही गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार अर्ज दिला असून, गुन्हा दाखल करून घेण्याची मागणी केली आहे.

सोन्याची नाणी, वाहनांचे आमिषपाच लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास दोन तोळे सोन्याचे नाणे, २० लाखांवर बुलेट, एक कोटीसाठी आलिशान कार भेट देण्याचे आमिष दाखवले जात होते. काही एजंटांना अशा प्रकारची बक्षिसे देऊन कंपनीने गुंतवणूक वाढवल्याची माहिती तक्रारदारांनी दिली.

भूलथापा मारून गंडवलेकंपनीकडे सेबीचे लायसन्स आहे. कंपनीच्या खात्यावर ५०० कोटी रुपये शिल्लक आहेत. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. सर्व व्यवहार पारदर्शक असतील, अशा भूलथापा लावून कंपनीने गुंतवणूकदारांना गंडवले. गुंतवणूक वाढवण्यासाठी शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी सेमिनारचे आयोजन केले होते.

पैसे मागणाऱ्यांना दमदाटीपरतावे बंद झाल्यानंतर गुंतवणूकदारांचा ससेमिरा टाळण्यासाठी दोन्ही संशयितांनी पुण्यात मुक्काम ठोकला. काही गुंतवणूकदारांनी पुण्यात जाऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, संशयितांनी दमदाटी करून त्यांना हाकलून लावले. सध्या तो पुण्यात गुंतवणूक करून घेत असल्याचे तक्रारदारांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिस