शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव; संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त - विशेष पोलिस महानिरीक्षक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:48 IST

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात ...

कोल्हापूर : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. परकीय नागरिकांसंदर्भात केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानुसार तत्काळ अंमलबजावणी केली जात आहे, ही माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.महानिरीक्षक फुलारी म्हणाले, पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्याच्या वरिष्ठ कार्यालयाला सूचना केल्या आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील सर्वच पोलिस महानिरीक्षक कार्यालयाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानिरीक्षकांच्या बैठका झाल्या आहेत. गुप्तचर विभाग, सायबर, दहशतवादविरोधी पथकाकडून खबरदारी घेतली जात आहे.कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण, पुणे ग्रामीण जिल्ह्यात सामाजिक शांतता राखण्यासाठी पोलिस योग्य ती खबरदारी घेत आहेत. काही संशयित परकीय नागरिक आढळल्यास त्याची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनला देण्याचे आवाहनही केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सूचना केल्या आहेत.

प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात ६१ पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य आहे. दीर्घ मुदतीच्या व्हिसाच्या आधारे यांचे अधिकृतरीत्या वास्तव्य आहे. यामध्ये तीन मुस्लिम महिला तर उर्वरित हिंदूंचा समावेश आहे. उर्वरित ५८ नागरिक धर्माने हिंदू आहेत. या सर्वांची माहिती पोलिसांनी घेतली आहे. त्यांच्या संपर्कात राहण्याच्या सूचना पोलिसांना केल्या आहेत. दर आठवड्याला संबंधित पोलिस स्टेशनकडून आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, मुंबईतील पारपत्र कार्यालयातून या सर्वांना त्यांच्या व्हिसाची मुदत नूतनीकरणाचे काम करून घ्यावे लागते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सार्क सवलतीच्या व्हिसाची सवलत काढण्याचे आदेश दिले. त्याबाबत कोल्हापूर प्रशासनाकडे अद्याप कोणतेही लेखी आदेश आलेले नाहीत. त्याबाबतचे आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे ही सांगण्यात आले.

निष्क्रिय डीबी पथके यापूर्वीच बरखास्तजिल्ह्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या घरफोडी, गंभीर चोरीच्या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे. मग शहरातील पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथक काय करते, या प्रश्नावर अधीक्षक खाटमोडे म्हणाले, ठराविक पोलिस ठाण्यातच गुन्हे शोधपथके आहेत. वेळोवेळी त्यांच्या कामाचा आढावा घेतला जातो. दाखल झालेल्या गुन्ह्याचा शोध किती वेळात लावला आहे, त्यासाठी सक्षम पुरावे आणि गोपनीय माहिती पथकाकडून घेतली जाते. निष्क्रिय असलेली पथके यापूर्वीच वरिष्ठांनी बरखास्त केली आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानPoliceपोलिस