माणगाव येथे कोरोनाचे ६ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST2021-05-07T04:25:10+5:302021-05-07T04:25:10+5:30
रुकडी माणगाव - माणगाव येथे कोरोनाने २९ रुग्ण बाधित असून, यापैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने सहा रुग्ण ...

माणगाव येथे कोरोनाचे ६ नवीन रुग्ण
रुकडी माणगाव -
माणगाव येथे कोरोनाने २९ रुग्ण बाधित असून, यापैकी दोन रुग्ण बरे झाले आहेत. नव्याने सहा रुग्ण बाधित झाले असून, अन्य दोन रुग्ण कोरोनाने संसर्गित असल्याने त्यांचा स्वॅब तपासणीस दिला आहे. त्याचा अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त झालेला नव्हता. गावातील रुग्णसंख्या ३१ वर जाण्याची शक्यता आहे.
माणगाव येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण वाढत असून, एकाच घरात दोन- दोन रुग्ण आढळत आहेत. ३१ रुग्णांपैकी दोन संशयित बरे होऊन परतले आहेत. तर सहा घरी, २० रुग्ण विविध वैद्यकीय केंद्रात उपचार घेत आहेत. कोरोनाचे काही रुग्ण व कुटुंबातील सदस्यांनी गावात मुक्त संचार केला आहे. विशेष म्हणजे एक कोरोना बाधित रुग्ण काळजी न घेता वैद्यकीय उपचारासाठी रात्रीच दवाखाना गाठत आहे. कोरोना बाधित रुग्णांनी स्वत:सह इतरांचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने बुधवार रात्री बारा वाजल्यापासून रविवार, ९ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संपूर्ण गाव बंद ठेवले आहे.