शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

गड, किल्ल्यावर दारू प्याल, तर ६ महिने जेलमध्ये जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 12:45 IST

१० हजार रुपये दंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली माहिती 

कोल्हापूर : राज्यातील गड, किल्ले हे राज्याच्या सुवर्ण इतिहासाचे साक्षीदार असून, त्यांचे पावित्र्य राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अशा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गैरशिस्तीने वागल्यास ६ महिने कारावास व १० हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी ही माहिती दिली.राज्यातील गड, किल्ले हे एक शौर्याचे प्रतीक आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे प्रत्येक किल्ल्याला एक वेगळा इतिहास लाभला आहे. तो नव्या पिढीला स्फूर्तिदायक सुद्धा आहे. परंतु अशा गड, किल्ल्यांवर अनेकदा मद्यपान करून गोंधळ घातला जातो, हुल्लडबाजी केली जाते. अनेकदा गंभीर गुन्ह्यांसारखे प्रकार घडतात. गड, किल्ल्यांवर पर्यटकांनी मद्यपान करून गैरशिस्त वागल्याचे आढळून आल्यास महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.ज्यांनी या गड, किल्ल्यांचे पावित्र्य राखायचे त्यांच्याकडूनच त्याला काळिमा फासण्याचे काम होत असल्यामुळे आता याबाबत यापुढे कठोर कारवाई होणार आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार पहिल्यांदा अपराध केल्यास ६ महिन्यापर्यंत सश्रम कारावास व १० हजार रुपयापर्यंत दंड, अशा शिक्षेची तरतूद आहे. त्यानंतरच्या पुन्हा अपराध केल्यास वाढीव शिक्षेची तरतूद आहे. पर्यटकांनी आपले गड, किल्ले पवित्र राहतील याची काळजी घ्यावी, असे आवाहनही आवळे यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFortगडCrime Newsगुन्हेगारी