शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
3
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
4
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
5
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
6
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
7
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
8
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
9
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
10
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
11
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
12
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
13
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
14
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
15
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
16
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
17
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
18
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
19
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
20
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी

संकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 19:31 IST

Highway Kolhapur-पुणे-बंगळूर आणि मुंबई -गोवा या महामार्गाला एकाच वेळी जोडणाऱ्या संकेश्वर ते बांदा या नव्या महामार्गाच्या बांधणीला पुन्हा एकदा गती येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडून पर्यटन व व्यापाराची व्याप्ती वाढवणाऱ्या या रस्त्यातील संकेश्वर ते आंबोली या ६१ किलोमीटरपर्यंतच्या नव्या रस्त्यासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार संजय मंडलीक यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी दिला असून आंबोली ते बांदा या मार्गासाठी पुढील वर्षी निधी मिळणार आहे.

ठळक मुद्देसंकेश्वर ते आंबोली महामार्गासाठी ५७४ कोटी मंजूर खासदार संजय मंडलिक यांच्या प्रयत्नांना यश

कोल्हापूर : पुणे-बंगळूर आणि मुंबई -गोवा या महामार्गाला एकाच वेळी जोडणाऱ्या संकेश्वर ते बांदा या नव्या महामार्गाच्या बांधणीला पुन्हा एकदा गती येणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांना जोडून पर्यटन व व्यापाराची व्याप्ती वाढवणाऱ्या या रस्त्यातील संकेश्वर ते आंबोली या ६१ किलोमीटरपर्यंतच्या नव्या रस्त्यासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. खासदार संजय मंडलीक यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा निधी दिला असून आंबोली ते बांदा या मार्गासाठी पुढील वर्षी निधी मिळणार आहे.गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. कोकणामध्येही पर्यटन मोठ्या प्रमाणात आहे. गोवा आणि कोकणात जाण्यासाठी आजरा - आंबोली मार्ग हा जवळचा मार्ग म्हणून वापरला जातो. सध्या या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ होत असून वाढती वाहतूक लक्षात घेता या संकेंश्वर ते बांदा या १०८ किलोमीटरच्या रस्त्याला महामार्गाला दर्जा देवून या रस्त्याचे दुहेरीकरण व्हावे अशी मागणी खासदार मंडलिक यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांचेकडे केली होती.

पर्यटन, व्यापारासह उद्योग धंदा वाढीसह वेळेची बचत होणार असल्याने याला प्राधान्य द्यावे अशी विनंती केली होती. या नव्या महामार्गामुळे महाराष्ट्र व कर्नाटकातील दूध, फळे, भाजीपाला, उद्योगासाठी लागणारा कच्चा-पक्का माल हा रेड्डी पोर्टवरुन इतरत्र देशभर पाठविणे शक्य होणार असल्याचेही निदर्शनास आणून दिले. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याची दखल घेवून हा निधी मंजूर झाला आहे.असा असेल मार्गया मागणीतील पहिला टप्पा म्हणून संकेश्वर - गडहिंग्लज - कोवाडे - आजरा - गवसे - आंबोली ६१ किमी रस्त्याकरीता भू-संपादनासह रस्त्याच्या बांधणीचे काम हाती घेण्याचे ठरले आहे.

टॅग्स :highwayमहामार्गAmboli hill stationआंबोलि हिल स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर