राधानगरीत ५७० अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:25 IST2020-12-31T04:25:40+5:302020-12-31T04:25:40+5:30

राधानगरी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकूण १६१ जांगासाठी बुधवारपर्यंत ...

570 applications filed in Radhanagar | राधानगरीत ५७० अर्ज दाखल

राधानगरीत ५७० अर्ज दाखल

राधानगरी तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी बुधवारी शेवटच्या दिवशी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले. एकूण १६१ जांगासाठी बुधवारपर्यंत ५७० अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने ५२७ व ऑफलाईन पद्धतीने ४३ अर्ज दाखल करण्यात आले. यापैकी ऐनी, बुरंबाळी, चाफोडी तर्फ ऐनघोल, सावर्दे – वडाचीवाडी व पंडेवाडी येथून आलेले अर्ज पाहता, येथील निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. बुधवारअखेर गवशी २५, बुरंबाळी १५, म्हासुर्ली ४४, ऐनी १३, चाफोडी तर्फ ऐनघोल १०, सावर्दे –वडाचीवाडी १२, राजापूर १८, कोनोली तर्फ असंडोली २२, कोदवडे २१, पंडेवाडी ११, हेळेवाडी २५, तळाशी ४०, पनोरी ३३, बुजवडे १८, गुडाळ ७२, खिंडीव्हरवडे ३१, कंथेवाडी ३९, नरतवडे ४५, आणाजे गावातून ५२ अर्ज दाखल झाले आहेत.

Web Title: 570 applications filed in Radhanagar