शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

५६ कोटींची फसवणूक; दाम्पत्याला अटक, दाेन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 12:33 IST

मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली.

कोल्हापूर : गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीचे प्रमुख रमेश महादेव वळसे-पाटील (वय ६०) आणि छाया रमेश वळसे-पाटील (वय ५४, दोघेही रा. आकुर्डी, जि. पुणे) या दाम्पत्याला आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी पुण्यातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता, रमेश याला सहा दिवसांची, तर छाया यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. अटकेतील संशयितांची सुमारे दोन कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

मेकर ग्रुप ऑफ इंडिया या कंपनीने २०१० ते २०१८ या कालावधीत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गुंतवणूकदारांची ५६ कोटी ५२ लाखांची फसवणूक केली. वारंवार पाठपुरावा करूनही भरलेले पैसे आणि त्यावरील परतावा परत मिळत नसल्याने डिसेंबर २०१८ मध्ये गुंतवणूकदारांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीसह २३ जणांवर गुन्हा दाखल झाला. 

आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपासाची सूत्रे येताच निरीक्षक कळमकर यांनी तपासात गती घेतली आहे. गेल्या आठवड्यातील या गुन्ह्यातील तिघांना अटक केली होती. त्यानंतर आता कंपनीचा प्रमुख आणि गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार रमेश वळसे-पाटील आणि त्याची पत्नी छाया या दोघांना पुण्यातून अटक केली. 

- दोन्ही संशयितांकडील सुमारे दोन कोटी रुपयांच्या मालमत्तांची कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत. - त्यांची बँक खाती गोठवण्यासाठी संबंधित बँकांशी पत्रव्यवहार केल्याची माहिती निरीक्षक कळमकर यांनी दिली.- आजपर्यंत या गुन्ह्यातील १० संशयितांना अटक झाली असून, अन्य १३ जणांचा शोध सुरू आहे.

गुंतवणूकदारांना दिलासा- गुन्हा दाखल होऊन पाच वर्षे उलटली तरी तपासाला विशेष गती नव्हती. कंपनीकडे अडकलेले कोट्यवधी रुपये कसे मिळणार, याची चिंता गुंतवणूकदारांना होती.- मात्र, काही गुंतवणूकदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपासामुळे फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार