हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ५५ कोटी ४१ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:23 IST2021-04-25T04:23:13+5:302021-04-25T04:23:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोची : केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) मधून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ...

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी ५५ कोटी ४१ लाखांचा निधी
लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा निधी (सी.आर.आय.एफ.) मधून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील रस्ते व पुलासाठी ५५ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख जिल्हामार्ग, राज्यमार्ग यांचा समावेश असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
हातकणंगले तालुक्यातील वडगाव-लाटवडे-भेंडवडे खोची ते दूधगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्त्याची सुधारणा करण्यासाठी चार कोटी ८७ लाख, पन्हाळा तालुक्यातील निगवे, कुशिरे, पोहाळे, गिरोली, कोडोली रस्त्यांची रुंदीकरणासह सुधारणा करणे- दोन कोटी ४३ लाख, राक्षी-धबधबेवाडी-निकमवाडी -इंजोळे-बांदिवडे-घुंगूर रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- दोन कोटी ४३ लाख, शिरोळ तालुक्यातील जे. जे. मगदूम इंजिनीअरिंग कॉलेजपासून नांदणी नाका ते चौंडेश्वरीकडे जाणाऱ्या रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- तीन कोटी ९६ लाख तसेच सांगली जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यातील शिरगाव-वाळवा या कृष्णा नदीवरील पुलासाठी ३३ कोटी ८७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याचबरोबर शिराळा कापरी कार्वे लाडेगाव येडेनिपाणी गोटखिंडी बावची आष्टा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे- तीन कोटी ८९ लाख, आष्टा दुधगाव सावळवाडी कुंभोज रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे तीन कोटी ९६ लाख, अशी एकूण ५५ कोटी ४१ लाख रुपयांची तरतूद केंद्र सरकारच्या निधीमधून करण्यात आलेली आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
हा निधी मंजूर करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण, सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील व कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे खासदार माने यांनी सांगितले.