शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तेलनाडेसह इचलकरंजीतील ५१ जण हद्दपार

By admin | Updated: August 27, 2014 23:23 IST

गावभाग पोलिसांची कारवाई : मनसे शहर अध्यक्ष, नगरसेविकेच्या पतीचा समावेश

इचलकरंजी : गणेशोत्सव काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गावभाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील ५१ जणांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच अन्य गुन्हे दाखल झालेल्या गुन्हेगारांवरदेखील तहसीलदार यांच्यासमोर शपथपत्र सादर करण्यासंदर्भातील नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गावभाग व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे एक हजारजणांचा यामध्ये समावेश आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपारीचे आदेश लवकरच काढण्यात येणार आहेत.गणेशोत्सव काळात समाजामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता पोलीस खात्याच्यावतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामध्ये गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगरसेवक संजय तेलनाडे, नगरसेविकेचा पती बंडोपंत मुसळे, मनसेचे शहर अध्यक्ष मोहन मालवणकर, शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मलकारी लवटे, अमर मगदूम, रॉबर्ट आवळे, जितेंद्र हजारे, समरजित पाटील, उल्हास पाटील, आदींसह भरत खारगे, शीतल इजारे, दिलीप माने, सचिन पताडे, युवराज पताडे, प्रवीण पवार, अस्लम सोलापुरे यांच्यासह सुमारे ५१ जणांना गणेशोत्सव काळात तालुका बंदी करण्यात आली आहे. तहसीलदारांच्या आदेशाने संबंधितांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू असून, गणेशोत्सव काळात यापैकी कोणीही शहरात आढळला, तर त्याच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक बी. एम. नलवडे यांनी सांगितले. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवरदेखील अशीच कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)