शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार देणार, अजित पवार यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 16:29 IST

कागल येथे राष्ट्रवादीचा मेळावा : लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटी वर्ग

कागल : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नियमित व प्रामाणिकपणे कर्ज फेडतो. अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना सूचना करून किती रक्कम लागते ती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही रक्कम देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. लाडक्या बहिणींसाठी सहा हजार कोटी वर्ग करूनच राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडलो आहे, असेही ते म्हणाले.येथील विविध विकासकामांच्या उद्घाटनानंतर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ, बाजार समिती सभापती प्रवीणसिंह पाटील, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, नवीद मुश्रीफ, आमरीन मुश्रीफ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, विलास गाताडे, वसंतराव धुरे, सतीश पाटील, सुधीर देसाई, चंद्रकांत गवळी आदी प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा आहे. निवडणुकीकरिता माझ्यासाठी कार्यकर्ते सहा महिन्यांपासून सज्ज झाले आहेत. प्रवीण काळबर, विजय काळे, शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांची भाषणे झाली. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांनी स्वागत केले. नितीन दिंडे यांनी आभार मानले.

मंत्री मुश्रीफांची उमेदवारी जाहीरउपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मागे एकदा मुश्रीफांना पालकमंत्री करू शकलो नाही, ही खंत यावेळी दूर केली. त्यांच्या मागे असणारी ताकत कागलकरांनी कधीच कमी केलेली नाही. आता त्यांच्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांना इतक्या उच्चांकी मताने निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे. त्याकरिता मी कमी पडणार नाही.

मुश्रीफांनी मागितली माफीमेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. महिलांची संख्या लक्षणीय होती. सभामंडपाबाहेर लोक दाटीवाटीने उभा होते. यशवंतराव घाटगे विद्यालयाच्या पटांगणात स्क्रीन उभारला होता. तेथेही महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पावसामुळे एवढे लोक येणार नाहीत म्हणून ही जागा घेतली. यामुळे गैरसोय झाली. याबद्दल मुश्रीफ यांनी भाषणात माफी मागितली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरी