शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाच्या लग्नासाठी ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला, कोल्हापुरात डॉक्टरांच्या फ्लॅटमध्ये भरदुपारी घरफोडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 11:40 IST

सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीत

कोल्हापूर : सीपीआरमधील मेडिसिन विभागप्रमुख डॉ.अनिता अरुण परितेकर (वय ५७, रा.अनंत प्राइड, न्यू शाहुपुरी, कोल्हापूर) यांनी मुलाच्या लग्नासाठी जपून ठेवलेल्या ५० तोळे दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. हा प्रकार सोमवारी (दि. ११) दुपारी घडला.

फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्यासह हिऱ्याचे दागिने आणि २५ हजारांची रोकड लंपास केली. गजबजलेल्या वस्तीत भरदुपारी झालेल्या धाडसी घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शाहुपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ.परितेकर या सीपीआरमध्ये मेडिसिन विभागप्रमुख आहेत. त्याचे पती महापालिकेत अधिकारी आहेत. मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेतो. सोमवारी सकाळी परितेकर दाम्पत्य कामासाठी घराबाहेर पडले. त्यानंतर, अकराच्या सुमारास मुलगा क्लासला गेला. दुपारी अडीच वाजता स्वयंपाकीण आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी फोन करून याची माहिती डॉ.परितेकर यांना दिली.परितेकर यांनी तातडीने घरी पोहोचून पाहिले असता, बेडरूमधील लाकडी कपाटातील तीन मंगळसूत्रे, कर्णफुले, सोनसाखळी, विविध आकाराच्या अंगठ्या, तोडे, ब्रेसलेट, हिऱ्याचे टॉप्स असे ५० तोळ्यांचे दागिने आणि २५ हजारांची रोकड चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले. बाजारभावानुसार याची किंमत सुमारे ५५ लाख रुपये आहे.माहिती मिळताच शाहुपुरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही. पोलिसांनी परितेकर यांची फिर्याद घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप कोणताही सुगावा हाती लागलेला नाही.

सीसीटीव्ही कॅमेरे लावलेच नाहीतअनंत प्राइड इमारतीत बेसमेंटला कॉमन सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मात्र, आठ दिवसांपूर्वीच तो बंद पडला. डॉ.परितेकर यांनी गेल्या महिन्यात स्वत:च्या फ्लॅटबाहेर लावण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणले आहेत. मात्र, वेळेअभावी ते लावता आले नाहीत. नेमकी याच वेळेत चोरी झाली.

चांदीच्या दागिन्यांना हात लावला नाहीपरितेकर यांच्या घरात चांदीचेही दागिने होते. मात्र, चोरट्यांनी चांदीच्या दागिन्यांना हातही लावला नाही. चोख सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने, तसेच किमती रत्न त्यांनी लंपास केले. यावरून चोरटे सराईत असावेत, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

मुलाच्या लग्नाची तयारीपरितेकर दाम्पत्याच्या मुलीचे लग्न झाले असून, त्यांना एक नात आहे. मुलाचे लग्न अजून व्हायचे आहे. मुलगा आणि नातीच्या लग्नासाठी त्यांनी दागिने जपून ठेवले होते. त्यावरच चोरट्यांनी डल्ला मारल्याने परितेकर कुटुंबीयांना धक्का बसला.