केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्यात मार्चपर्यंत ५० टक्के सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:15 IST2021-01-08T05:15:44+5:302021-01-08T05:15:44+5:30

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरची नाट्यचळवळ टिकून राहावी, या उद्देशाने येथून पुढे कायमस्वरूपी भाडे कमी करण्याबाबत १ फेब्रुवारीला बैठक घेऊन ...

50% discount on rent of Keshavrao Bhosale Natyagriha till March | केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्यात मार्चपर्यंत ५० टक्के सवलत

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाड्यात मार्चपर्यंत ५० टक्के सवलत

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरची नाट्यचळवळ टिकून राहावी, या उद्देशाने येथून पुढे कायमस्वरूपी भाडे कमी करण्याबाबत १ फेब्रुवारीला बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेऊ.

यावेळी नाट्यसंस्था आणि रंगकर्मी यांनी नाट्यगृहातील समस्यांचा पाढा वाचला. विद्यासागर अध्यापक, आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, किरण चव्हाण, सागर बगाडे, आदींनी नाटयगृहातील समस्या मांडल्या. पालकमंत्री पाटील यांनी महापालिका प्रशासनाला करायच्या कामांचा प्रस्ताव करण्याची सूचना करत पायाभूत सुविधांसाठी २० लाखांचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून देण्याची ग्वाही दिली.

चौकट

रंगकर्मींने केलेल्या मागण्या

कायमस्वरुपी ५ हजार भाडे ठेवा, तिकीट विक्री कक्ष तीन करावीत. किमान २० स्पॉटलाईन बसवाव्यात. ग्रीन रूममध्ये सुविधा देण्यात याव्यात. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, बॉक्स सेट बसवावेत. सुतार आणि वायरमन कायमस्वरूपी नियुक्त करावेत. अपंगासाठी कायमस्वरूपी रॅम्पची सोय करा, स्थानिक नाट्यसंस्थांना एक शनिवार आणि रविवार नाट्यगृह आरक्षित ठेवावे. पुन्हा नृत्य कार्यक्रमासाठी नाट्यगृह भाड्याने मिळावे. नाटकाच्या तालमींसाठी पेंढारकर दालनाचे भाडे कमी करावे. नगरसेवकांच्या सहा खुर्चांचे आरक्षण रद्द करा. तिकीट न लावणाऱ्यांनाही भाड्यात सवलत मिळावी.

पालकमंत्री पाटील म्हणाले,

तातडीने २० स्पॉटलाईट, दोन बॉक्स सेट, १० फॅन देणार

अपंगासाठी तात्पुरत्या रॅम्पची सोय करणार

व्यावसायिक नाटकांना १० ते ३० टक्के भाडे होणार

बेलबाग आयटी पार्क परिसरात लवकरच २ हजार क्षमतेचे नाट्यगृह

चौकट

मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी

महापालिका प्रशासनाने उपहारगृह, साहित्य ठेवण्यासाठी रूम, पेंढारकर कलादालन अद्ययावर करणे ही कामे दुसऱ्या टप्प्यात शासनाकडून मिळणाऱ्या निधीतून केली जाणार असल्याचे म्हटल्याने रंगकर्मी संतापले. यावर पालकमंत्री पाटील यांनी कोरोनामुळे राज्य शासनाची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे निधी मिळण्यास अडचणी येत आहे. आता यामध्ये सुधारणा होता असून मार्चनंतर दुसऱ्या टप्प्यातील निधी आणू,

फोटो : ०४०१२०२० कोल केएमसी केशवराव बैठक

फोटो : ०४०१२०२० कोल केएमसी केशवराव बेठक २

ओळी : कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहातील समस्यांसंदर्भात सोमवारी पालकमंत्री सतेज पाटील, रंगकर्मी, नाट्यसंस्थांची बैठक झाली.

फोटो : ०४०१२०२० कोल केएमसी केशवराव बैठक ३

ओळी : केशवराव भोसले नाट्यगृहासंदर्भातील बैठकीवेळी नाट्यकर्मी, नाट्यसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: 50% discount on rent of Keshavrao Bhosale Natyagriha till March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.