पाच लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: January 15, 2015 00:12 IST2015-01-15T00:06:32+5:302015-01-15T00:12:05+5:30
इचलकरंजीत कारवाई : अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई

पाच लाखांचा गुटखा जप्त
इचलकरंजी : शहर व परिसरात अन्न व औषध प्रशासन विभाग कोल्हापूरच्या पथकाने आज, बुधवारी दिवसभरात तीन ठिकाणी छापा टाकला. यामध्ये सुमारे पाच लाख रुपयांचा गुटखा, सुगंधी सुपारी व पानमसाल्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. यामुळे शहरातील गुटखा विक्रेत्यांच्यात खळबळ उडाली.
या पथकामध्ये सहायक आयुक्त (अन्न) सुकुमार चौगुले, अन्नसुरक्षा अधिकारी बिभीषण मुळे, एम. डी. पाटील, ए. एम. रणदिवे, एस. एस. सावंत, आदींचा समावेश होता. मुळे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. (प्रतिनिधी)
डेक्कन चौक परिसरात असलेल्या भाग्यलक्ष्मी घाऊक विक्री दुकानावर टाकलेल्या छाप्यामध्ये सुगंधी सुपारी, पानमसाला, सुगंधी तंबाखू असा ३३ हजार ५७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कोरोची (ता. हातकणंगले) येथील सुजन किराणा स्टोअर्समध्ये छापा टाकून विविध कंपन्यांचा २८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला; तर लायकर थिएटरजवळ असलेल्या चेतक घाऊक विक्री दुकानवजा गोडावूनवर छापा टाकून त्या ठिकाणाहूनही चार लाख १९ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. तीनही कारवायांत मिळून एकूण चार लाख ८० हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.