शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीतील कारागीराकडून कोल्हापूरच्या दोघा सराफांना ४७ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 10:47 IST

crimenews, kolhapur, police सोन्या-चांदीचे दागिने तयार करून देतो, असे सांगून कोल्हापुरातील दोघा सराफांना सुमारे ४७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित कारागीर श्रीकांत ऊर्फ अमित तवनाप्पा कांते (रा. पाटील गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा नोंद झाला. सराफ व्यावसायिक जितेंद्र शामराव गरडे व प्रशांत जाधव (दोघेही रा. शिवाजी पेठ) यांनी तक्रार दिली.

ठळक मुद्देहुपरीतील कारागीराकडून कोल्हापूरच्या दोघा सराफांना ४७ लाखांचा गंडा पोलिसात तक्रारी दाखल : सोने घेऊन दागिने करून देण्याच्या व्यवहारात केली फसवणूक

 कोल्हापूर : सोन्या-चांदीचे दागिने तयार करून देतो, असे सांगून कोल्हापुरातील दोघा सराफांना सुमारे ४७ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सोमवारी सायंकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संशयित कारागीर श्रीकांत ऊर्फ अमित तवनाप्पा कांते (रा. पाटील गल्ली, हुपरी, ता. हातकणंगले) याच्यावर गुन्हा नोंद झाला. सराफ व्यावसायिक जितेंद्र शामराव गरडे व प्रशांत जाधव (दोघेही रा. शिवाजी पेठ) यांनी तक्रार दिली.गरडे व जाधव या सराफांचे गुजरी कासार गल्लीत इंद्रशांती प्लाझा आणि सावित्री प्लाझा येथे सराफ दुकाने आहेत. दोघेही सराफ व्यावसायिक संशयित आरोपी अमित कांते याला सोने व चांदी देऊन त्याच्याकडून दागिने तयार करून घेत होते. त्यातून गेले काही वर्षे त्यांचे व्यवहार सुरू होते. संशयित कांते याचा हुपरीमध्ये दागिने तयार करण्याचा करखाना होता. त्याच्या हाताखाली कामगार होते.

सराफांनी सोने-चांदी दिल्यानंतर त्याचे टप्प्या-टप्प्याने दागिने तयार करून तो या सराफांना परत देत होता; पण २०१६ पासून त्याच्याकडे सोने-चांदी बाकी वाढत गेली. सराफांनी त्याच्याकडे उर्वरित सोन्याचे दागिने परत करण्यासाठी तगादा लावला; पण त्याने ते देण्याचे वारंवार आश्वासन दिले.

गेली महिनाभर संशयिताचा मोबाईल बंद होता तसेच तो हुपरी येथेही राहत नसल्याचे समजल्याने सराफांना घाम फुटला. दोघा सराफांनी सुमारे ४७ लाख २० हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कांते विरोधात तक्रार दिली. पुढील तपास उपनिरीक्षक योगेश पाटील करत आहेत.फसवणुकीची व्याप्ती वाढणारकोल्हापुरातील अनेक सराफांना तो दागिने बनवून देत होता, त्यामुळे संशयित कांते याने अनेकांना गंडा घातल्याचे समजते. या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी व्यक्त केली. संशयिताने कोल्हापूरसह सांगली तसेच बेळगाव येथीलही सराफांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची चर्चा सराफ बाजारात आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस