शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पाणी निर्गतीसाठी ४५७ कोटी निधी द्यावा, जागतिक बँक पथकासमोर आराखडा सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 13:06 IST

पूरसंरक्षण भिंतीसह ३६८ किलोमीटर गटर्सचे नियोजन

कोल्हापूर : शहरातील पाऊस पाण्याचे निर्गतीकरण गतीने होण्यासाठी शहरात नव्याने ३६८ किलोमीटरचे गटर्स तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेस ४५७ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. यातून गटर्ससह पूरसंरक्षण भिंतही बांधण्यात येईल, अशी माहिती प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी जागतिक बँकेच्या पथकास सांगितली. महापालिकेत बैठक झाली. बैठकीत पथकासमोर पाऊस, पूर पाण्याच्या निर्गतीकरणासाठीचा आराखडा सादर केला. यावेळी पथकातील सदस्यांनी तातडीने करावयाच्या आणि दीर्घकालीन करावयाच्या कामांचा समावेश करण्याच्या सूचना दिल्या.शासनाच्या मित्रा संस्थेतर्फे महापूर नियंत्रणासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. उपाययोजनांसाठी जागतिक बँक कर्ज देणार आहे. यासाठी जागतिक बँकेचे जोलांटा, अनुप, शीना, टीजर्क यांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी शहरातील पूरबाधित परिसराची पाहणी केल्यानंतर महापालिकेत बैठक घेतली. बैठकीत महापूर आल्यानंतर कोणत्या सेवा विस्कळीत होतात, याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, शहर उपरचनाकार रमेश मस्कर यांनी दिली.यावेळी मित्राचे अधिकारी अनुप यांनी महापूर धोका नियंत्रण आराखडा तयार केला आहे? याची विचारणा केली. मात्र, त्यांनी जसा आरखडा अपेक्षित होता, तसा महापालिकेने तयार केला नसल्याचे बैठकीत सांगण्यात आले. यामुळे अनुप यांनी पुढील ५० वर्षे गृहीत धरून महापूर धोका नियंत्रण आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासक मंजुलक्ष्मी म्हणाल्या, पाऊस, पूर, महापुराचे पाणी तातडीने निर्गत होण्यासाठी शहरात गटर्स बांधणीचे काम सुरू आहे. यासाठी निधीची गरज आहे. पायाभूत विकासासाठी निधी लागणार आहे.

मस्कर म्हणाले, ब्लू, रेड लाईन तयार आहे. यानुसार शहरात बांधकामांना परवानगी दिली जाते. बैठकीस अतिरिक्त आयुक्त राहुल रोखडे, आदी उपस्थित होते.

रियल टाईम माहितीसाठी स्वतंत्र कक्षपूर, महापूर, आपत्तीची माहिती रियल टाईम मिळण्यासाठी शहर, जिल्ह्यासाठीचे स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक सुविधा असतील, अशीही माहिती मंजुलक्ष्मी यांनी दिली.

भेट देऊन घेतली माहितीताराराणी चौकातील फायर स्टेशन, सुतार वाडा, रिलायन्स मॉलच्या पाठीमागील परिसर, जयंती नाला बंधारा, विन्स हॉस्पिटल, आदी आदी पूरबाधित परिसरास पथकाने भेट देऊन पाहणी करून माहिती घेतली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरbankबँकfundsनिधी