शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Municipal Election 2026: ईर्षा...तणाव...वादावादी; इचलकरंजीत ४५६ उमेदवारी अर्ज दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:59 IST

माजी आमदार, पोलिसांमध्ये वादावादी

इचलकरंजी : महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ विक्रमी अर्ज दाखल झाले. तसेच आजतागायत एकूण ४५६ अर्ज दाखल झाले. उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रभाग समिती कार्यालयात सोडण्यावरून माजी आमदार व पोलिसांमध्ये वादावादी झाली, तर एका उमेदवाराचा अर्ज दोन मिनिटे उशिरा आल्याने भरायचा राहून गेला. शिव-शाहू विकास आघाडीने पदयात्रा काढून उमेदवारी अर्ज दाखल केले.महानगरपालिकेच्या ६५ जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ३९१ इतके उमेदवारी अर्ज चार प्रभाग समिती कार्यालयांत दाखल झाले. महायुती व शिव-शाहू आघाडीतील उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.शहापूर येथील प्रभाग समिती कार्यालयात क्रांती आवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी माजी आमदार राजीव आवळे आले होते. सूचक व अनुमोदकाला आत घेऊन जाण्यावरून आवळे व पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यात जोरदार वादावादी होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काही पोलिसांनी आवळे यांना बाजूला घेऊन हा वाद मिटविला. तसेच शाहू पुतळ्याजवळील प्रभाग समिती कार्यालयात गर्दी झाल्याने अनेकांना गुदमरू लागले. त्यामुळे ज्यांचे काम झाले आहे, त्यांना बाहेर सोडा यासाठी जोरजोराने शटर वाजवून ते उघडण्यास भाग पाडले, या कारणावरून पोलिस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात वादावादीचा प्रकार घडला.प्रभाग क्रमांक १६ मधून प्रीतम कोरे हे संतोष सावंत यांच्यासमवेत जुन्या नगरपालिकेतील प्रभाग समिती कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आले होते. दोन मिनिटे उशिरा आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. दरवाजा बंद केल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांना आहे तसेच त्यांना परतावे लागले.ठीक ३ वाजता प्रभाग समिती कार्यालयाचे दार बंद करण्यात आले. आतमध्ये असलेल्या सर्वांची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आत असलेल्यांना बाहेर सोडण्यात आले. एकूणच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया काही वादाचे प्रसंग वगळता शांततेत पार पडली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Election Sees Tension, Disputes as 456 Nominations Filed

Web Summary : Ichalkaranji municipal elections witnessed a flurry of activity with 456 nominations filed. Tensions arose between politicians and police over entry protocols, while one candidate missed the deadline by two minutes. Despite some arguments, the process largely concluded peacefully.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Policeपोलिस