कोल्हापूर : चार्टर्ड अकाउंटंट्स अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून, यात कोल्हापूर विभागात ४४ विद्यार्थ्यांनी यश मिळवत सीए पदाला गवसणी घातली. या अभ्यासक्रमाची मे २०२५ मध्ये परीक्षा झाली होती. कोल्हापूर विभागातून ३०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात ४२ जण उत्तीर्ण झाले. राजस्व महेश हिरवे यांनी प्रथम क्रमांक, सन्मय संदेश कदम यांनी द्वितीय, तर अर्चना नारायण कुलकर्णी यांनी तिसरा क्रमांक मिळविला.प्रिया सुरेश अग्रवाल, आर्या अमोल कुलकर्णी, अमृता अनंत जाधव, साक्षी जयकुमार पाटील, संयम संजय गुंदेशा, आदित्य श्रीराम दातार, ऋता केदार पारगावकर, कल्पेश बाळू पाटील, विजय वासुदेव हिंदुजा, श्रद्धा माधव पानवलकर, मयूर संजय वाळवेकर, सेबेस्टिना व्हिक्टर बारदेसकर, विवेक माधव विभुते, प्राजक्ता आनंदा थोरुसे, प्राजक्ता बाहुबली होसुरे, चिरंजीवी श्रीनिवास तेलसंग, मोहिनी महादेव परीट, रितिका महेश पटेल, ऋतुजा सुखदेव तळवार, राहुल अविनाश महाजन, मधुरा दिनेश पाटील, गायत्री जितेंद्र शिवणकर, खुशी गौरंग भट्ट, आदित्य अवधूत कुलकर्णी, शारदा संजय मिरजकर, आशिष प्रकाश ठकार, श्वेता दिलीप संकपाळ, श्रुती लिलेश पटेल, ऐश्वर्या विजय पितालिया, जयश्री जिन्नाप्पा कुराडे, वैभव चंद्रकांत पाटील, वृषभ सुकुमार पाटील, सौरभ भैरवनाथ यादव, अमृता अनिल पाटील, पूजा भानुशाली, प्राजक्ता प्रवीण देवेकर, रोहित अशोक कोळी, अक्षय सुभाष पाटील आणि जुगल बापूसाहेब गायकवाड व मुस्कान महेश तुलसाणी हे विद्यार्थी कोल्हापूर विभागातून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांना दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे मार्गदर्शन मिळाले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेच्या वतीने सीए करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनेक सोयीसुविधा दिल्या आहेत. त्यांच्यासाठी संगणक, संभाषण कौशल्य, स्कील डेव्हलपमेंट असे कोर्स चालविले जातात. तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. त्याचा परिणाम निकालात दिसत आहे. -नितीन हारुगडे, अध्यक्ष, दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, कोल्हापूर शाखा.