शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

राज्यातील ४२ हजार कैद्यांना मतदानाचा हक्क नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 05:23 IST

राज्यातील ४४ कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही.

- एकनाथ पाटीलकोल्हापूर : राज्यातील ४४ कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कलम १५१ नुसार त्यांच्या मतदानाचा हक्क गोठविण्यात आला आहे.राज्यात नऊ मध्यवर्ती आणि ३५ जिल्ह्यात उपकारागृह आहेत. त्यामध्ये कळंबा-कोल्हापूरसह येरवडा-पुणे, तळोजा-नवी मुंबई, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, ठाणे, नाशिक यांचा समावेश आहे. मध्यवर्ती कारागृहात दोन ते साडेतीन हजार, तर ३५ जिल्ह्यांतील उपकारागृहात प्रत्येकी २०० ते ४०० कैदी शिक्षा भोगत आहेत. दोन्ही प्रकारच्या कारागृहांतील सुमारे ४२ हजार कैद्यांना मतदानापासून दूर राहावे लागत आहेत. प्रत्येक कारागृहात राज्यातील विविध जिल्ह्यातील गुन्हेगार आहेत. मुंबईतील कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांना मतदानासाठी मुंबईला घेऊन जाणेही सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे. कारागृहाची सुरक्षा यंत्रणाही अपुरी आहे. कैद्यांना मतदानाचा हक्क दिल्यास प्रत्येक जण अर्ज करून मागणी करेल. याचा संपूर्ण भार कारागृह प्रशासनावर पडेल, या सर्व घटनांचा विचार करून पूर्वीपासूनच कैद्यांचा मतदानाचा हक्क गोठविण्यात आला आहे.राज्य निवडणूक आयोग जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मोहीम राबविते. महाविद्यालय, शहरासह ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांवर मतदान जागृतीचा उपक्रमही राबविण्यात आला. यासाठी शासकीय प्रतिनिधी घराघरांपर्यंत पोहोचले. समाजातील विविध घटकांसोबत तृतीयपंथीयांनाही मतदान करता यावे, यासाठी प्रबोधन करून त्यांची नोंदणी करण्यात आली. कैदी मात्र, या मोहिमेचा भाग बनू शकत नाहीत. लोकसभा, विधानसभेतच नव्हे, तर ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषदेसह खासगी सहकारी संस्थांच्या निवडणुकीतही कैद्यांना मतदान करता येत नाही.>राज्यघटनेतील तरतुदीनुसारच कारागृहात शिक्षा भोगणाºया कैद्यांना मतदान करता येत नाही. माझ्या २७ वर्षांच्या सेवेत एकदाही कैद्याला मताचा अधिकार मिळालेले नाही.- दत्तात्रय गावडे, अधीक्षक, कळंबा मध्यवर्ती कारागृह

टॅग्स :jailतुरुंगLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019kolhapur-pcकोल्हापूर