शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: इचलकरंजीत मंजुरीपेक्षा ४२ टक्के पोलिस कमी, गुन्हेगारीचा आलेख पाहता संख्या तोकडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 13:11 IST

अतुल आंबी इचलकरंजी : शहरातील तीन पोलिस ठाणे, वाहतूक शाखा असे सर्व मिळून २८९ पोलिस मंजूर आहेत. त्यात ११९ ...

अतुल आंबीइचलकरंजी : शहरातील तीन पोलिस ठाणे, वाहतूक शाखा असे सर्व मिळून २८९ पोलिस मंजूर आहेत. त्यात ११९ पोलिस कमी असल्याने हजर असलेल्या १७० पोलिसांवरच कामाचा बोजा पडत आहे. त्यात साप्ताहिक सुटी, रजा, प्रतिनियुक्ती व आजारी रजा असे पोलिस वजा केल्यास नियमित कामात येणारी संख्या अतिशय तोकडी पडत आहे. औद्योगिक शहर असल्याने येथील गुन्हेगारीचा आलेख पाहता शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.सरकारकडून नेहमी पोलिस दलातील सुधारणेविषयी आश्वासने दिली जातात. प्रत्यक्षात मात्र अत्यंत कमी मनुष्यबळावर पोलिस दलास आपले कर्तव्य बजवावे लागत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढून अनेक पोलिसांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यात जनताभिमुख पोलिसिंगमुळे पोलिसांचा वट कमी झाल्याचे दिसत आहे. पूर्वी एखादा दुसरा पोलिस दिसला, तरी जमाव संयमात राहत होता. आता मोर्चा, आंदोलने यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागतो. त्याचबरोबर गुन्हेगारी कृत्य करणारेही राजकीय पाठबळ घेऊन वावरत असल्याने पोलिसांना तारेवरची कसरत करत त्यांना गुन्ह्यात हाताळावे लागते.वस्त्रोद्योग नगरीच्यानिमित्ताने देशभरातील विविध राज्यांतून नागरिक या शहरात येऊन राहतात. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे तसेच त्याठिकाणाहून हद्दपार झालेले असे लोक येथे आपले गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करण्यासाठी हालचाली करतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आवश्यक आहे. सध्या इचलकरंजीसहकोल्हापूर जिल्हा व राज्यातील पोलिस संख्या कमीच आहे. परंतु इचलकरंजीची संवेदनशीलता व गुन्हेगारी पाहता शहरात तीनही पोलिस ठाण्यांत आवश्यक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे.

पोलिस उपअधीक्षक पदही रिक्तवस्त्रनगरीच्या राजकीय, औद्योगिक व गुन्हेगारीचे चित्र पाहता याठिकाणी खमक्या अधिकाºयाची गरज आहे. सर्व पोलिस ठाण्यांवर नियंत्रण ठेऊन योग्य काम करून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले उपअधीक्षकपदही दोन महिने झाले रिक्त आहे.   पोलिस ठाणे      मंजूर       हजर      प्रतिनियुक्ती     कमीशिवाजीनगर -      ८६          ६१            ८                    ५३गावभाग -            ९४          ४३            ०                    ५१शहापूर -             ७५          ३७            ०                    ३८वाहतूक शाखा     ३४           २९            ०                    ५

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliceपोलिसichalkaranji-acइचलकरंजी