शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Crime: तिप्पट फायद्याच्या आमिषाने क्रिप्टो करन्सीमध्ये ४० लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 16:52 IST

ऑक्टोबरपर्यंत बँक खात्यावर परतावे येत होते; परंतु त्यानंतर परतावे मिळण्याबाबत तक्रारी सुरु झाल्या.

कोल्हापूर : क्रिप्टो करन्सीमध्ये गुूंतवणूक करा..तुम्हाला ३०० दिवसांत तिप्पट फायदा करून देतो, असे सांगून इचलकरंजी, तारदाळ परिसरातील चौदा गुंतवणूकदारांची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार संबंधित गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केली. अशाच प्रकारच्या फसवणुकीची तक्रार इचलकरंजीत शिवाजीनगर पोलिस ठाणे व गांधीनगर पोलिस ठाण्यातही झाली आहे. जिल्ह्यातील फसवणुकीचा आकडा काही कोटी रुपयांवर असण्याची शक्यता आहे.डॉक्सी फायनान्स कंपनी स्थापन करून त्याआधारे इंद्रजित कोरे (रा.जयसिंगपूर), राजू पांगिरे, खलील पन्हाळकर व मोहसिन खुदावंत (रा.तिघेही इचलकरंजी) व अंजुम (रा.सांगली) अशी फसवणूक केलेल्यांची नावे आहेत. या कंपनीत गुंतवणूकदारांनी सरासरी १ लाख, ३ लाख, ५ लाख, ७ लाख ते १६ लाखांपर्यंत प्रत्येकी गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झाली. त्यानंतर दिवसाला एक टक्का याप्रमाणे ऑक्टोबरपर्यंत बँक खात्यावर परतावे येत होते; परंतु त्यानंतर परतावे मिळण्याबाबत तक्रारी सुरु झाल्या. कंपनीची अडचण असून जानेवारीपर्यंत सर्व सुरळीत होईल, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतु पैसे मिळायचे बंद झाल्यावर वारंवार हेलपाटे मारूनही पैसे परत मिळत नाही म्हटल्यावर गुंतवणूकदारांनी पोलिसांचा दरवाजा ठोठावला आहे.

स्वप्निल कुडाळकर, अनिकेत कुकरेजा, देविका सतराणी, एस.नरेश, सुरेश पटेल, संतोष पटेल, घनश्याम तारदाळकर, शशिकांत मुळे, राजेंद्र भस्मे, सचिन बी, संजय कोळी, संतोष पुजारी, विशाल गायकवाड, अझहर लासोटे, प्रकाश रावळ यांची फसवणूक झाली आहे. त्या सर्वांनी मिळून पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन फसवणुकीची तक्रार दिली.

गांधीनगरमधील जास्त लोक..फसवणूक झालेल्यामध्ये गांधीनगरमधील जास्त लोक असल्याची माहिती पुढे आली आहे. हॉटेलमध्ये बोलावून कंपनीबद्दल माहिती देण्यात याच पाच लोकांचा समावेश होता. त्यांच्याविरुद्धच तक्रार देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस