शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आजरा नगरपंचायतीचे ४० कर्मचारी समायोजनाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:31 IST

सदाशिव मोरे आजरा : आजरा नगरपंचायतीच्या ४० कर्मचा-यांचे अद्यापही नगरविकास विभागाकडे समायोजन झालेले नाही. सफाई व पाणीपुरवठा विभागातील या ...

सदाशिव मोरे

आजरा

: आजरा नगरपंचायतीच्या ४० कर्मचा-यांचे अद्यापही नगरविकास विभागाकडे समायोजन झालेले नाही. सफाई व पाणीपुरवठा विभागातील या कर्मचा-यांना गेल्या अनेक वर्षांपासून तुटपुंज्या पगारावर काम करावे लागत आहे. वाढीव आकृतीबंधानुसार कर्मचा-यांचे समायोजन न झालेस नगरपंचायतीला भविष्यकाळात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होवून ३ वर्षे ९ महिने झाले आहेत.

ग्रामपंचायतीकडील ५३ कर्मचा-यांपैकी फक्त १३ कर्मचा-यांची नगरपंचायतीकडे समायोजन झाले आहे. ४० कर्मचारी अद्यापही समायोजनाच्या प्रतीक्षेत आहेत. लिपिक ५, सफाई कर्मचारी २१, पाणीपुरवठा कर्मचारी १४ असे ४० कर्मचारी आहेत.

२०११ च्या लोकसंख्येनुसार वाढीव आकृतीबंध मंजूर होवून त्यानुसार कर्मचा-यांचे समायोजन करा, अशी कर्मचारी संघटनेची मागणी आहे. मात्र नगरविकास विभागाकडून अद्यापही त्याला मंजुरी मिळालेली नाही.

समायोजनाच्या प्रतीक्षेत असलेले आजरा नगरपंचायतीकडील सफाई व पाणीपुरवठा कर्मचारी गेल्या २० ते २५ वर्षांपासून ग्रामपंचायतीपासून कार्यरत आहेत. या कर्मचा-यांचे नगरविकास विभागाकडे समायोजन होणे गरजेचे आहे. शहराची स्वच्छता व पाणीपुरवठा ज्यांच्या हातात आहे. असेच कर्मचारी समायोजनापासून वंचित व तुटपुंज्या पगारावर काम करीत आहेत. भविष्यकाळात या कर्मचा-यांनी अचानक काम थांबविलेस नगरपंचायतीचे प्रशासन कोलमडण्याची शक्यता आहे.

....नगरपंचायती इकडे शासनाचे अधिकारीच नाहीत

आजरा नगरपंचायत सुरू होऊन ३ वर्षे ९ महिन्यांचा कालखंड झाला आहे. तरीही आकृतीबंधानुसार बांधकाम, स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासकीय, नगररचना या विभागाचे अधिकारीच नाहीत. मुख्याधिकारी, लेखापाल व कर निरीक्षकच आजरा नगरपंचायतीचा कारभार कर्मचा-यांना घेऊन सांभाळत आहेत.