शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर विकासासाठी ४० कोटींचा निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 12:30 IST

या निर्णयामुळे अंबाबाई मंदिराच्या परिसर विकासाला चालना मिळणार

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरविकास विभागाने ४० कोटींचा निधी मंजूर केला असून, शुक्रवारी शासन निर्णयअंतर्गत याचा अध्यादेश काढण्यात आला आहे. या निर्णयामुळे अंबाबाई मंदिराच्या परिसर विकासाला चालना मिळणार आहे. अंबाबाई मंदिर विकास कॉरिडॉरसाठीच्या १४०० कोटींचा आराखड्याचा हा पहिला टप्पा असेल.अंबाबाई मंदिर विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील ८० कोटींच्या विकासकामांना २०१९ साली मंजुरी देण्यात आली होती. त्यांपैकी आलेल्या १० कोटी ७० लाखांच्या निधीत बहुमजली पार्किंगचे काम करण्यात येत आहे. प्रथम टप्प्यात मंजूर केलेल्या निधीपैकी चालू आर्थिक वर्षात ६९.२६ कोटींच्या मागणीचा प्रस्ताव नियोजन व वित्त विभागाला सादर करण्यात आला होता. त्यानुसार सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या पूरक मागणीद्वारे सहायक अनुदाने (वेतनेतर) या लेखाशीर्षाखाली ४० कोटी इतका निधी उपलब्ध करुन दिला असून, निधी वितरित करण्यास नियोजन व वित्त विभागाने मंजुरी दिली आहे.अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चालू वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून रु. ४० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात येत असून, उपलब्ध करून दिलेल्या निधीपेक्षा जास्तीचे दायित्व घेण्यात येऊ नये, असे अध्यादेशात म्हटले आहे.पावनखिंडसाठी १५ कोटीस्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव योजनेंतर्गत पावनखिंड येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी १४ कोटी ९५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर