शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सुटे भाग नसल्यामुळे केएमटी बसेस धुळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:32 IST

कोल्हापूर महापालिका परिवहनचे (केएमटी) अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. दररोज तीन ते चार लाखांचा तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देकेएमटी वर्कशॉपच्या बजेटला कात्री लावल्याचा फटका : बस बंदमुळे तोट्यात भर

विनोद सावंतकोल्हापूर : सुटे भाग नसल्यामुळे केएमटीच्या दररोज किमान १२ बसेस वर्कशॉपमध्ये धूळ खात पडत आहेत. वर्कशॉपसाठी अपेक्षित बजेट मिळत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तोटा कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घातले नाही तर बंद बसेसची संख्या वाढण्याचा धोका आहे.

कोल्हापूर महापालिका परिवहनचे (केएमटी) अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत. दररोज तीन ते चार लाखांचा तोटा होत आहे. हा तोटा कमी करण्यासाठी केएमटी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यांना अपेक्षित यश येत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी, महाभाई भत्ता, विविध कंपनींची देणी असे १९ कोटी रुपयांचे देणे बाकी आहे. या सर्वांचा परिणाम केएमटी वर्कशॉपच्या कामकाजावर होत आहे.

एकीकडे केएमटीची आर्थिक स्थिती सुधारण्याचे आव्हान असताना दुसरीकडे बसेस नादुरुस्ती ही डोकेदुखी झाली आहे. वर्कशॉपला दर महिन्याला २५ लाखांची गरज असताना केवळ १५ लाख रुपयेच मिळत आहेत. येथील कामकाजावर याचा परिणाम होत आहे. एक बस दररोज २५ हजार किलोमीटरचा प्रवास करते. त्यामुळे बसेस खराब होण्याचे प्रमाणही वाढत आहे. सुटे भाग विक्री करणाºया कंपनी आगाऊ बिल दिल्याशिवाय सुटे भाग देत नाहीत. त्यामुळे दररोज १२ बसेस वर्कशॉपमध्ये बंद राहत आहेत. दुरुस्तीसाठी आलेल्या एका बसचे सुटे भाग दुसºया बसला घालण्याचा प्रकार वर्कशॉपमध्ये सुरू आहे. बस बंद राहत असल्यामुळे काही मार्गावरील बससेवा बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर येत आहे. याचा फटका एकूण उत्पन्नावर होत आहे. केएमटीची सेवा ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर सुरू आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून राज्य शासनाने तसेच महापालिका प्रशासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे.केएमटीची सद्य:स्थिती

  • एकूण बसेस - १२९
  • नवीन बस अशोक लेलँड - ७५
  • जुन्या बसेस टाटा - ५४
  • सुस्थितीतील बसेस - ९५ ते १००
  • सुटे भाग नसल्यामुळे बंद असणाºया बसेस - १२
  • एक बसचा दररोजचा प्रवास - २५ हजार किलोमीटर
  • कार्यक्षेत्र - शहर व शहरालगत २० किलोमीटर

-वर्कशॉपसाठी महिन्याला आवश्यक बजेट - २५ लाख-प्रशासनाकडून मिळणारे बजेट - १५ लाख---------------------------------केएमटीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करता प्राधान्यानुसार खर्च केला जातो. यामध्ये डिझेल खरेदीला प्रथम प्राधान्य दिले जाते. यानंतर टायर, सुट्या भागांची खरेदी केली जाते. वाहक नसल्यामुळेही बसेस बंद ठेवाव्या लागतात. या सर्वांचा विचार करून दररोजचे १०२ बसेसचेच शेड्यूल केले जाणार आहे.- संजय भोसले, अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक--------------------------------------नवीन बसचा खुळखुळाकेएमटीकडे २००५ मध्ये ३९, तर २००९ मध्ये १५ बसेस खरेदी केल्या आहेत,, तर २०१५ मध्ये केंद्र शासनाकडून ७५ बसेस मिळाल्या आहेत. यामध्ये बहुतेक जुन्या बसेस सुस्थितीमध्ये आहेत, तर नवीन बसेस जादा खराब होत आहेत. सध्या यामधील आठ बसेस सुटे भाग मिळाले नसल्यामुळे वर्कशॉपमध्ये धूळ खात आहेत. जुन्यामधील चार बसेस बंद आहेत.-----------------------------------

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका