शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात घरोघरी थ्रीडी राम मंदिर सोहळा, राजेश क्षीरसागरांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 14:04 IST

लकी ड्राद्वारे दहा कुटुंबीयांना अयोध्येत जाण्याची संधी

कोल्हापूर : अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम मंदिराचे सोमवारी २२ जानेवारी २०२४ ला उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्रत्येक घराघरांत हा सोहळा साजरा व्हावा. याकरिता थ्रीडी श्रीराम मंदिर निर्माण पुस्तिकेची निर्मिती केली आहे. त्याद्वारे मंदिर बनवून संपूर्ण कुटुंबालाही या सोहळ्यात सहभागी होता येणार आहे. अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.क्षीरसागर म्हणाले, या पुस्तिकेमध्ये श्रीराम मंदिराची प्रतिकृती बनविण्याचे क्यूआर कोडद्वारे चित्रीकरण व तंत्र आणि साहित्य देण्यात आले आहे. पुस्तिकेमध्ये दिलेले मंदिराचे भाग एकत्र जोडून कुटुंबातील सर्व जण एकत्र मिळून मंदिराची प्रतिकृती बनवू शकतात. या पुस्तिकेमध्ये अयोध्या श्रीराम मंदिराचा इतिहास, संपूर्ण रामायण चित्रमय रूपात, रामरक्षा, प्रभू श्रीरामांची १०८ नावे, तसेच लहान मुलांना रंगविण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या प्रतिमा आदी पुरविण्यात आले आहे. देशात अशी संकल्पना प्रथमच कोल्हापुरात राबविली जात असून ही पुस्तिका क्षीरसागर यांच्यामार्फत मोफत दिली जाणार आहे. पन्नास हजारांहून अधिक पुस्तिका घरोघरी पोहोचविल्या जाणार आहेत. पुस्तिकेसाठी २८ डिसेंबर २०२३ ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करता येणार आहे. शहराच्या विविध ठिकाणी नोंदणी काउंटर व व्हॅन उपलब्ध केली जाणार आहे. ही पुस्तिका १६ जानेवारीपर्यंत रामभक्तांना घरपोच मिळणार आहे. बनविलेले थ्रीडी राम मंदिरसोबत आपल्या कुटुंबाचा एक सेल्फी पाठवावयाचा असून, यामधून लकी ड्रॉच्या माध्यमातून १० कुटुंबांना अयोध्येला जाण्याची संधी दिली जाणार आहे.यावेळी ऋतुराज क्षीरसागर, पुस्तिकेची छपाई करणारे साईप्रसाद बेकनाळकर, शारदा बामणे, संतोष कंदारे, हिंदू एकता पदाधिकारी दीपक देसाई, गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, हिंदू महासभेचे मनोहर सोरप, पतीतपावनचे अवधूत भाट्ये, अप्पा बनेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, प्रवीण पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरRam Mandirराम मंदिर