सापडलेली ३८ हजाराची बॅग दिली परत, के.एम.टी. चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 17:40 IST2020-11-10T17:38:59+5:302020-11-10T17:40:09+5:30
kmt, hospital, bus, kolhapurnews, muncipaltycarportation सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या नागरीकांची ३८ हजारांची बँग विसरली होती. केएमटीचे चालक कृष्णा गणपती वरुटे, वाहक विनोद दादू समुद्रे यांना ती मिळाली. त्या दोघोना प्रामाणिकपणे त्यांना बॅग परत केली. त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

सापडलेली ३८ हजाराची बॅग दिली परत, के.एम.टी. चालक-वाहकांचा प्रामाणिकपणा
कोल्हापूर : सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या नागरीकांची ३८ हजारांची बँग विसरली होती. केएमटीचे चालक कृष्णा गणपती वरुटे, वाहक विनोद दादू समुद्रे यांना ती मिळाली. त्या दोघोना प्रामाणिकपणे त्यांना बॅग परत केली. त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.
नंदगाव ता. करवीर येथील सचिन भगवान चौगले हे बहिणीसोबत सोमवारी सावित्रीबाई फुले रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. रुग्णालयाच्या आवारात घाईगडबडीमुळे त्यांची बॅग विसरली.
यामध्ये ३८ हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्रे होती. याच ठिकाणी केएमटीचे चालक कृष्णा वरुटे, वाहक विनोद समुद्रे यांची ड्यूटी होती. त्यांना बॅग आढळून आली. ओळख पटवून त्यांनी प्रामाणिकपणे चौगले यांना परत दिली.