शहरातील आणखी ३७ गुंड हद्दपार
By Admin | Updated: September 7, 2014 00:55 IST2014-09-07T00:54:15+5:302014-09-07T00:55:21+5:30
कोल्हापूर : शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिसांनी आज, शनिवार पेठ हद्दीतील गुंड गुरू लाड,

शहरातील आणखी ३७ गुंड हद्दपार
कोल्हापूर : शाहूपुरी व जुना राजवाडा पोलिसांनी आज, शनिवार पेठ हद्दीतील गुंड गुरू लाड, विक्रम पोलादे, स्वप्निल पाथरुट, पाप्या गायकवाड, योगेश राणे, सूरज राणे, शशिकांत गायकवाड यांच्यासह ३७ जणांना कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातून मंगळवार (दि.९) मध्यरात्री बारा वाजेपर्यंत हद्दपार केले.
ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे व पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव व दिनकर मोहिते यांनी केली. या सर्वांवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्रवेशास मनाई करिता पोलीस ठाण्याने प्रस्ताव दिला होता. त्यानुसार करवीरच्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ५ ते ९ सप्टेंबरपर्यंत शहर व करवीर तालुक्यामध्ये प्रवेश करण्यास सक्त मनाई केली.