चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:04+5:302021-05-12T04:24:04+5:30

सदाशिव मोरे । आजरा : आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. ...

36% water balance in Chitri Madhyam project | चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक

सदाशिव मोरे ।

आजरा

: आजरा-गडहिंग्लज तालुक्याला वरदान ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पात ३६ टक्के (६७४ द.ल.घ.फू.) पाणीसाठा शिल्लक आहे. वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न संपला असला आहे. परंतु, पिण्याच्या पाण्यासाठी शेवटच्या आवर्तनातून ३५० द.ल.घ.फू. पाणी चित्रीतून सोडले जाणार असून, ३२४ द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक ठेवला जाणार आहे.

आजरा तालुक्यातील चित्री प्रकल्पामुळे आजऱ्यातील ६१४ तर गडहिंग्लजमधील ८१३६ एकर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चित्रीसह एरंडोळ, धनगरवाडी, खानापूर प्रकल्पामुळे १३,०८५ हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. त्यामुळे आजरा व मलिग्रे जि. प. मतदार संघामधील बहुतांशी गावे हिरवीगार झाली आहेत. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना हिरण्यकेशी नदीवरून झाल्या आहेत. त्यामुळे आजरा व गडहिंग्लज तालुक्याला गेल्या दहा ते बारा वर्षांत पाणी टंचाईच्या झळा कमी बसत आहेत.

चित्रीच्या पाण्यावर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मितीही केली जाते. चित्री धरण पावसाळ्यात पूर्ण भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर वीज निर्मिती केली जाते.

चित्री धरणातून चालू वर्षी तीन आवर्तनातून पाणी सोडले आहे. त्यामुळे पाणीटंचाई कोठेही बसली नाही. अद्यापही धरणातील पाणीसाठा मुबलक आहे. चित्रित ३६ टक्के, एरंडोळ ६८ टक्के, धनगरवाडी २० टक्के, खानापूर २१ टक्के असा पाणीसाठा शिल्लक आहे.

चालूवर्षी झालेल्या वळवाच्या पावसाने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे चित्रीतून येत्या चार दिवसांत शेवटचे आवर्तन पिण्याच्या पाण्यासाठी सुरू केले जाणार आहे. ३५० द.ल.घ.फू. पाणीसाठा चौथ्या आवर्तनातून सोडला जाणार आहे.

------------------------

*

चित्रीच्या पाण्यावर विद्युत निर्मिती

चित्रीच्या पाण्यावर २०११ पासून तात्यासाहेब कोरे वारणानगर या कंपनीकडून वीजनिर्मिती सुरू आहे. पावसाळ्यात चित्री धरण १०० टक्के भरल्यानंतर व उन्हाळ्यात पाण्याची आवर्तने सुरू झाल्यानंतर दररोज दोन मेगावॅट विजेची निर्मिती होते.

Web Title: 36% water balance in Chitri Madhyam project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.