इचलकरंजीत ३६ पॉझिटिव्ह; आठजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:24 IST2021-05-24T04:24:23+5:302021-05-24T04:24:23+5:30

इचलकरंजी : शहरात विविध २० भागांत ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच उपचारांदरम्यान जवाहरनगर येथील ८२ वर्षीय वृद्ध ...

36 positive in Ichalkaranji; Eight killed | इचलकरंजीत ३६ पॉझिटिव्ह; आठजणांचा मृत्यू

इचलकरंजीत ३६ पॉझिटिव्ह; आठजणांचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात विविध २० भागांत ३६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच उपचारांदरम्यान जवाहरनगर येथील ८२ वर्षीय वृद्ध व ६४ वर्षीय महिला, आंबेडकरनगरमधील ४० वर्षीय महिला, आमराई रोड ७० वर्षीय वृद्ध, यशवंत कॉलनी ५३ वर्षीय पुरुष, गणेशनगर ४२ वर्षीय पुरुष, विक्रमनगर ५५ वर्षीय पुरुष, शहापूर ६६ वर्षीय वृद्ध यांचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अशोकनगर, सहकारनगर, लायकर मळा प्रत्येकी ४, विक्रमनगर, गणेशनगर, शहापूर प्रत्येकी ३, यशवंत कॉलनी २, गावभाग, जुनी नगरपालिकेजवळ, मंगळवार पेठ, पाटील मळा, बोहरा मार्केट, जुना चंदूर रोड, संभाजी चौक, दातार मळा, बंडगर माळ, भोनेमाळ, जवाहरनगर, दत्तनगर, सांगली नाका येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सहा हजार ३२६ जणांना कोरोनाची लागण झाली असून, पाच हजार ८८ बरे झाले आहेत. ४२५ जण उपचार घेत असून, ३१३ वर मृत्यूसंख्या पोहोचली आहे.

Web Title: 36 positive in Ichalkaranji; Eight killed