इचलकरंजीत ३५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:18 IST2021-06-24T04:18:22+5:302021-06-24T04:18:22+5:30

इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध २३ भागांतील ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान शेळके मळा येथील ७० वर्षीय ...

35 positive in Ichalkaranji; Death of one | इचलकरंजीत ३५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजीत ३५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

इचलकरंजी : शहरात बुधवारी विविध २३ भागांतील ३५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. उपचारादरम्यान शेळके मळा येथील ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये सांगली नाका ५, दाते मळा ४, टिळक रोड ३, कलानगर, नाईक मळा, मुक्त सैनिक सोसायटी, तोरणानगर प्रत्येकी २, नदीवेस नाका, मंगळवार पेठ, सरस्वती मार्केट, आरगे मळा, पाटील मळा, गुरूकन्नननगर, शेळके मळा, घोडकेनगर, विवेकानंद कॉलनी, कमला-नेहरू सोसायटी, जवाहरनगर, खंजिरे इंडस्ट्रियल इस्टेटजवळ, कारंडे मळा, अवधूतनगर, इंदिरा हौसिंग सोसायटी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. आतापर्यंत सात हजार ७२७ जणांना लागण झाली आहे. सात हजार ६ जण बरे झाले असून, ३४९ जण उपचार घेत आहेत. ३७३ वर मृत्यूसंख्या पोहचली आहे.

Web Title: 35 positive in Ichalkaranji; Death of one