शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू, अडीच महिन्यातील आकडेवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:50 IST

कोल्हापूर जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यूअडीच महिन्यातील आकडेवारी 

कोल्हापूर : जिल्ह्यात नदी, धरण, तलाव, विहीरीवर उत्साही तरुण वाहत्या पाण्यात उड्या मारून पोहण्याचे धाडस करीत असतात; पोहण्याचा सराव नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. १ जानेवारी ते १९ मार्च या अडीच महिन्यांत जिल्ह्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झालेची नोंद पोलीस दप्तरी आहे.जिल्ह्यात नदी, तलाव, विहीरीमध्ये अंघोळीसाठी पोहायला गेलेल्या अनेकांना जीव गमवावा लागला आहे. रंगपंचमी खेळून अंघोळीसाठी गेलेल्या काही तरुण परत घरी परतले नाहीत. पाण्याची खोली, पोहण्याचा सराव नसल्याने अडीच महिन्यात ३५ जणांचा बुडून मृत्यू झाला.

सध्या मार्च-एप्रिल महिना सुरु आहे. उष्म्याचे प्रमाण वाढते आहे. परिक्षा संपल्यानंतर कॉलेज युवक, शाळेच्या मुलांचा नदी, तलाव, विहीरीकडे पोहण्याचा कल जास्त असतो. त्यामुळे एप्रिल-मे या दोन महिन्यात बुडून मृत्यू पावलेल्यांची संखा जास्त असते. त्यामुळे युवक, मुले, त्यांच्या पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

पोहायला येत असेल तरच मुलांना स्विमींग टँकमध्ये सोडावे, नदी, विहीर, तलावामध्ये गाळ साचलेला असतो. उत्साही तरुण, मुले वरुन उड्या मारतात. अशावेळी गाळात अडकण्याची भिती जास्त असते. पोहताना पाठशिवीणीचा खेळ, बॉलने पाण्यात खेळणे अशा गेमही जिवीतास धोका ठरतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देवून त्यांना तलाव, विहीरीवर अंघोळ करण्यास मनाई करणे गरजेचे आहे.

 

युवक आपल्या साहसाचा अतिरेक करीत आहेत. त्यांनी तो करू नये. नद्या, विहीरी, तलाव आदी ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडू लागल्या आहेत. प्रत्येकाने आपली मागे कोणीतरी काळजी करीत आहे, याचे भान ठेवावे.दिनकर कांबळे,जीवरक्षक

 

  1. अंगावर जड कपडे घालून पोहण्यास उतरु नये
  2. ज्या ठिकाणी पोहायला जाता त्या तलाव, नदी किंवा विहीरीच्या खोलीचा अंदाज घ्यावा.
  3. वयानुसार पोहण्याचा सराव किती आहे, तितकेच पोहणे गरजेचे आहे.
  4. पाण्यात कोणताही गेम खेळू नका.
  5. पोहण्याच्या ठिकाणी तरंगणारे कॅन, दोरी, बांबू ठेवावा, जेणेकरुन एखाद्याचा जीव वाचविता येईल.
  6. ४५ मिनीटाच्या वर पाण्यात थांबु नये.
  7. घरच्या लोकांना सांगुन पोहण्यास जावे.
  8. पोहायला येत असेल तरच पाण्याजवळ जावे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणीAccidentअपघात