शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:59 IST

लवकरच होणार हद्दवाढ

कोल्हापूर : काँग्रेसचे दहा नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार असल्याचा दावा आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. रविवारी दुपारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, पुढच्याच महिन्यात काही प्रवेश होणार असून, टप्प्याटप्प्याने क्षेपणास्त्रे डागून विरोधकांचे तळ उद्ध्वस्त केले जातील. लवकरच कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढ होणार, असाही दावा त्यांनी यावेळी केला.क्षीरसागर म्हणाले, आम्ही महापालिका महायुती म्हणून लढणार आहोत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर नेता आमच्या पाठीशी असल्याने कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर करून दाखविणार आहोत. हद्दवाढ नाही झाली तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असे सत्यजीत कदम म्हणाले होते. याबाबत विचारणा केली असता, क्षीरसागर म्हणाले, बहिष्कार टाकणे मी उचित समजत नाही. मात्र, हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये हे माझेही मत आहे. मी राज्य शासनासोबत प्रत्येक ठिकाणी हद्दवाढीच्या बाबतीत आग्रही मागणी करीत आलो आहे. एकूणच वरिष्ठ पातळीवरील हालचाली पाहता, लवकरच हद्दवाढ होईल, असा मला विश्वास आहे.कोल्हापूरच्या विविध प्रश्नांबाबत उत्तरे देत असतानाच क्षीरसागर म्हणाले, की महापुरासारखी समस्या निर्माण होत असताना मी २०१ १ साली ‘रेड झोन’च्या मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी रेड झोनमध्ये कोणतीही बांधकामे होणार नाहीत असे जाहीर केले होते. परंतु इथल्या स्थानिक नेत्याने स्वतचे रुग्णालय आणि हॉटेल वाचविण्यासाठी ब्ल्यू लाईनचाही घोळ घातला आहे, हे विसरून चालणार नाही. आपली सोय करताना इतरांना दाणीला द्यायचं अशी त्यांची वृत्ती आहे. सत्तेचा फायदा घ्यावा, त्याविषयी आमचे दुमत नाही. परंतु इथेतर गैरफायदाच अधिक घेतला गेला. टीडीआर घोटाळा, घरफाळा घोटाळा हे घोटाळे महापालिकेत झालेले आहेत.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, महानगरप्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक कमलाकर जगदाळे, शहरप्रमुख रणजीत जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळाेखे, शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर यांच्यासह माजी नगरसेवक राजू हंबुे, अजित मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना