शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील भूविकास बँकेचे ३३ हजार शेतकरी कर्जमुक्त होणार, कर्मचाऱ्यांचा वनवासही संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:36 IST

राज्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने १ हजार २ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत.

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्यातील भूविकास बँकेच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी येत्या दोन दिवसात होणार असून, राज्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने १ हजार २ कोटी ७७ लाख रुपयांची कर्जे माफ होणार आहेत. कर्मचाऱ्यांचा वनवासही संपुष्टात येणार असून राज्य सरकारने सहकार विभागाकडून माहिती मागवली आहे.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीसह पूरक व्यवसायासाठी दीर्घ मुदतीने कर्जपुरवठा करण्याचे काम राज्यातील भूविकास बँकांनी केले. पाणीपुरवठ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा झाल्याने ग्रामीण भागात पंचवीस-तीस वर्षांपूर्वी सिंचनाचे क्षेत्र वाढले त्यामध्ये भूविकास बँकांचे योगदान खूप मोठे आहे; मात्र दीर्घ मुदतीची कर्ज वसुली काहीसी मंदावली आणि शासनाच्या कचखाऊ धोरणामुळे बँका अडचणीत आल्या.वसुली ठप्प झाली आणि बँकांना अखेरची घरघर लागली. बँकांचे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले. वसुली थांबल्याने पगार होईनात, त्यातच राज्य सरकारने बँका अवसायनात काढण्याचा निर्णय घेतला. अवसायक मंडळ कार्यरत झाल्याने वसुलीला वेग येईल, असे वाटत असतानाच सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षांनी कर्जमाफीचा धडाका लावल्याने ‘भूविकास’ची वसुली पूर्णपणे थांबली.महाविकास आघाडीने १८ ऑगस्ट २०२१ रोजी भूविकास बँकेच्या थकबाकीदारांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. सात-आठ महिने शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. सात/ बारावर भूविकासचे कर्ज दिसत असल्याने इतर कर्जे घेता येत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने थकबाकी, कर्मचाऱ्यांची देणी, मालमत्ता याची माहिती मागवली आहे. उद्या, शुक्रवारी कर्जमाफीची घोषणा होणार असून तशी तरतूद होणार असल्याचे समजते. त्यानुसार राज्यातील ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा होणार आहे.

साडेपाचशे कोटींच्या मालमत्ता

राज्यात भूविकास बँकांच्या त्या त्या शहरातील मोक्याची ठिकाणी मालमत्ता आहेत. त्याची बाजारभावानुसार ५५५ कोटी ६१ लाख रुपये मूल्यांकन होते. या मालमत्ता राज्य सरकार ताब्यात घेणार आहे.

३२ महिने पगाराविनाकोल्हापूर भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना ३२ महिने पगार नाही. तर विदर्भ व कोकणातील भूविकास बँकेच्या कर्मचाऱ्यांना तब्बल दहा वर्षे पगाराची प्रतीक्षा आहे.

कोल्हापुरातील ९४२ शेतकऱ्यांना फायदा

कोल्हापूर जिल्ह्यातील ९४२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार आहे. त्यांचे प्रचलित दराने ४१.९३ कोटी तर ओटीएस नुसार ५.६१ कोटी माफी मिळणार आहे. तर २०८ कर्मचाऱ्यांना १२.२६ कोटी रुपये मिळणार आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी