मुक्तसैनिक वसाहतीत ३३ हजारांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:29 IST2021-09-16T04:29:18+5:302021-09-16T04:29:18+5:30

कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहतमधील लक्ष्मीनारायण नगरात चोरट्याने बंद घर फोडून सुमारे ३३ हजारांचे साहित्य लंपास केले. चोरट्याने रोकडसह ...

33,000 burglary in Muktasainik colony | मुक्तसैनिक वसाहतीत ३३ हजारांची घरफोडी

मुक्तसैनिक वसाहतीत ३३ हजारांची घरफोडी

कोल्हापूर : मुक्तसैनिक वसाहतमधील लक्ष्मीनारायण नगरात चोरट्याने बंद घर फोडून सुमारे ३३ हजारांचे साहित्य लंपास केले. चोरट्याने रोकडसह सोन्याचे दागिने लांबवले. याबाबत शशिकांत निवृत्ती मोरे (वय ५४) यांनी घरफोडीची शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शशिकांत मोरे हे रविवारी (दि. १२) घराच्या दरवाजाला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. मंगळवारी घरी परतले असता घरफोडी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूपत तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी तिजोरीचेही कुलूप तोडले. तिजोरीतील ११ हजार ५०० ची रोकड, तसेच ६ ग्रॅम सोन्याची अंगठी, ४ ग्रॅमचे कानातील टॉप्स, असा सुमारे ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला.

Web Title: 33,000 burglary in Muktasainik colony