शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर! व्याज सवलतीचे ३३.९८ कोटी दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर, तीन वर्षांचा परतावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:02 IST

पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते

राजाराम लोंढेकोल्हापूर : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतील प्रलंबित २ लाख ६७ हजार २५६ शेतकऱ्यांचे अनुदानापोटी ३३ कोटी ९८ लाख रूपये दोन दिवसात त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. २०१८-१९ ते २०२०-२१ या तीन वर्षांचा व्याज परतावा मिळणार असून, जिल्ह्यासाठी गेल्या आर्थिक वर्षात ५६ कोटी २८ लाख रूपये आले आहेत.शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची योजना सुरू आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँकांच्या माध्यमातून वाटप केलेल्या पीक कर्जावर राज्य शासन शेतकऱ्यांना व्याज सवलत देते. पूर्वी एक लाखापर्यंत पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने दिले जायचे. आता कर्जमर्यादा तीन लाखापर्यंत केली आहे. पीक कर्जाची उचल केल्यापासून ३६५ दिवसांच्या आत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना व्याज सवलत दिली जाते.आपल्याकडे ऊस पीक मोठ्या प्रमाणात असल्याने मार्च व जूनमध्ये पीक कर्जाची उचल होते.गेल्या वर्षभरात ३ लाख ९१ हजार २२ शेतकऱ्यांना ५६ कोटी २८ लाख ६४ हजार रूपये व्याज परताव्याची रक्कम मिळाली आहे. मार्च महिन्यात २ लाख ४३ हजार ९३६ शेतकऱ्यांचे ३० कोटी ९९ लाख व २३ हजार ३२० शेतकऱ्यांचे २ कोटी ९९ लाख असे ३३ कोटी ९८ लाख रूपये आले आहेत.२०२१-२२ या आर्थिक वर्षातील प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांना आगामी वर्षभरात व्याज परताव्याचे पैसे मिळणार आहेत.

पाच लाखांपर्यंतचा लाभ २०२२-२३ पासून

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पाच लाख पीक कर्ज शून्य टक्के व्याज दराने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी २०२२-२३ पासून केल्याने याचा लाभ पुढील वर्षी मिळणार आहे.विकास संस्थांकडून व्याजाची वसुलीविकास संस्था संबंधित शेतकऱ्यांकडून ६ टक्केप्रमाणे व्याजाची वसुली करतात. शासनाकडून व्याज परतावा आल्यानंतर तो शेतकऱ्यांना दिला जातो.

जिल्ह्यात ८५ टक्के शेतकऱ्यांकडून नियमित परतफेडजिल्ह्यात पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ८५ टक्के शेतकऱ्यांकडून वर्षाच्या आत परतफेड केली जाते. जिल्हा बँक २,१४५ कोटी पीक कर्जाचे वाटप करते. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूरला व्याज परताव्याचा लाभ अधिक मिळतो.

वर्षभरात असे आलेत पैसे :कार्यालय    -  परताव्याचे आलेले पैसेआयुक्त कार्यालय  -  ४८ कोटी २८ लाख ७१ हजारजिल्हा नियोजन समिती  -  ७ कोटी ९९ लाख ९३ हजार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी