चारित्र्य, प्रेमप्रकरण, मालमत्ता वादातून गेला ३२ जणांचा बळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:24 AM2021-09-19T04:24:04+5:302021-09-19T04:24:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : चारित्र्याचा संशय, प्रेमप्रकरण, मालमत्तेचा वाद तसेच गँगवार आदी कारणास्तव गेल्या आठ महिन्यांत ३२ जणांचे ...

32 killed in character, love affair, property dispute | चारित्र्य, प्रेमप्रकरण, मालमत्ता वादातून गेला ३२ जणांचा बळी!

चारित्र्य, प्रेमप्रकरण, मालमत्ता वादातून गेला ३२ जणांचा बळी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : चारित्र्याचा संशय, प्रेमप्रकरण, मालमत्तेचा वाद तसेच गँगवार आदी कारणास्तव गेल्या आठ महिन्यांत ३२ जणांचे खून पडले. यामध्ये अल्पवयीन मुला-मुलींचा अधिक समावेश आहे. खुनाच्या प्रयत्नाच्या ६६ घटना घडल्या. बलात्काराच्या १०९ घटना नोंद झाल्या. इतक्या मोठ्या संख्येने जिल्ह्यातील क्राईमचा आलेख अलीकडच्या कालावधीत चढताच राहिला आहे.

एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्यूरो)चा २०२०चा अहवाल नुकताच जाहीर झाला. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात ४६ खून झाले. त्यामुळे जिल्ह्यात महिन्याला चार खून, बलात्काराच्या व फूस लावून पळवल्याच्या प्रत्येकी दहा ते बारा घटना घडतात. गुन्हेगारीचा आलेख पोलीस खात्यासमोर आव्हानात्मक बनला आहे. २०२१ मध्ये अलीकडच्या दोन-अडीच महिन्यांत अल्पवयीन मुली-मुलांचे खून होण्याच्या घटनांत वाढ झाली. प्रेमप्रकरण अगर प्रेमातील अडसर दूर करणे या बाबीतून निष्पाप बालकांना जीव गमवावा लागला.

१) २०१९

खून : ४८

खुनाचा प्रयत्न : ८५

बलात्कार : १२८

फूस लावून पळवणे : २३८

२) २०२०

खून : ४६

खुनाचा प्रयत्न : ८५

बलात्कार : ११५

फूस लावून पळवणे : १५०

३) २०२१ (ऑगस्टपर्यंत)

खून : ३१

खुनाचा प्रयत्न : ६६

बलात्कार : १०९

फूस लावून पळवणे : १३१

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ९७ टक्के

खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, फूस लावून पळवणे यासारख्या घटना मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. त्याचे उघडकीचे प्रमाण हे ९७ टक्के आहे. प्रेमप्रकरणातून अनेक मुली पळून गेल्याच्याही घटना वाढताहेत. मुले-मुली परत आल्यानंतर बहुतांश मुलांना फूस लावून पळवल्याची तक्रार नोंद होते.

तीन घटनांनी हादरला जिल्हा

१) प्रेमप्रकरणावरूनच बापाने मुलीला नदीत टाकले : प्रियकराचा नाद सोडत नाही, म्हणून रागाच्या भरात शिरोळ येथील पित्यानेच १७ वर्षीय लेकीला दत्तवाड (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना ऑगस्ट २०२१ मध्ये उघडकीस आली. लेकीने प्रियकाराचा नाद सोडावा म्हणून तिचे दुसऱ्याशी लग्न केले, पण लग्नानंतरही ती प्रियकाराच्या संपर्कात राहिल्याने संतुलन बिघडलेल्या पित्याने तिला नदीत टाकून खून केला.

२) इचलकरंजीत सावत्र बापाने मुलीला नदीत फेकले : यळगुड येथील नऊ वर्षीय मुलीला चांदी कारागीर असलेल्या सावत्र बापाने इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकून खून केला. मुलीच्या कारणांवरून वाद वाढत असल्याने पित्याने तिचा खून केल्याचे उघडकीस आले.

३) सोनाळीत बालकाची हत्या : कागल तालुक्यातील सोनाळी येथील आठ वर्षांच्या बालकाची गेल्याच महिन्यात हत्या झाली. हत्याप्रकरणी पोलिसांनी घरात नेहमी वावर असणाऱ्या संशयित आरोपीस अटक केली, त्याने खुनाची कबुलीही दिली. पण, हत्या कोणत्या कारणांसाठी झाली याचे गूढ अद्याप उलगडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

Web Title: 32 killed in character, love affair, property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.