चतुर्थ श्रेणीची ३१८ पदे मंजूर, कार्यरत १७०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:24 IST2021-05-12T04:24:26+5:302021-05-12T04:24:26+5:30

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार ...

318 Class IV posts sanctioned, 170 working | चतुर्थ श्रेणीची ३१८ पदे मंजूर, कार्यरत १७०

चतुर्थ श्रेणीची ३१८ पदे मंजूर, कार्यरत १७०

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार रुग्णालयामधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची ३१८ पदे मंजूर असताना सध्या केवळ १७० पदे भरली आहेत. कोरोनाच्या काळामध्ये या अपुऱ्या मनुष्यबळावर प्रचंड ताण येत असून ही भरती करावी यासह अनेक वर्षे प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार दि. १७ मे पासून आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, या ठिकाणी ३१८ पदे मंजूर असताना केवळ १७० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यातील अनेक कर्मचारी प्रयोगशाळा, आस्थापना कार्यालय, ब्लड बँक, एक्स-रे विभाग, शस्त्रक्रिया विभाग येथे कार्यरत आहेत. त्यामुळे रुग्ण कक्षात काम करण्यासाठी कर्मचारी कमी पडत आहेत.

स्वच्छतेचा ठेका असणारे कर्मचारी रात्रीच्या वेळेस उपस्थित नसतात. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचाही अंकुश नसतो आणि याचा भार नियमित कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यामुळे या पुढच्या काळात कंत्राटी कर्मचारी घेण्यापेक्षा सरळसेवेने भरती करा यासह संघटना विविध मागण्यांसाठी आंदोलन करणार आहे.

Web Title: 318 Class IV posts sanctioned, 170 working

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.