शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३१४ गर्भवतींना गावातून हलवले, जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 17:27 IST

सीईओंची चिखली, आंबेवाडीला भेट

कोल्हापूर : जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा परिषदेने आपली यंत्रणा आणखी सक्रिय केली आहे. आरोग्य विभागाने बाराही तालुक्यांतील संपर्क तुटू शकणाऱ्या गावातील ३१४ गरोदर महिलांना सुरक्षितपणे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हलवले आहे. यामध्ये सर्वाधिक महिला या हातकणंगले तालुक्यातील आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी बुधवारी सकाळी आंबेवाडी, प्रयाग चिखली, शिये येथे भेटी देऊन पाहणी केली.सध्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य सहायक आणि ग्रामसेवक पदाच्या परीक्षा सुरू आहेत. बुधवारच्या दुपारी होणाऱ्या दोन सत्रांतील परीक्षेसाठी प्रयाग चिखलीची माध्यमिक शाळा केंद्र म्हणून निवडण्यात आले होते. आदिवासी क्षेत्र आणि कोकण विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रद्द झालेल्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येत आहे. या ठिकाणी रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने परीक्षार्थींना जाता येईल की नाही याची खात्री करण्यासाठी कार्तिकेयन आणि सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई सकाळी सव्वानऊ वाजता चिखली येथे गेले होते. संध्याकाळपर्यंत पूर्णपणे वाहतूक बंद होणार नसल्याची खात्री झाल्याने आणि परीक्षार्थींना येण्याजाण्याची अडचण नसल्याचे स्पष्ट झाल्याने याबाबतची पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. दरम्यान, संध्याकाळी जर पाणी वाढले आणि विद्यार्थ्यांची गावाबाहेर जाण्याची अडचण झाली तर रिक्षाची व्यवस्था करण्याच्याही सूचना ग्रामसेवकांना देण्यात आल्या होत्या. पुढे कार्तिकेयन यांनी सोनतळी येथील जनावरांच्या छावणीलाही भेट दिली. या वेळी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर सोबत होते. या वेळी वेळीच ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरित व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या.

तालुकावर हलवण्यात आलेल्या गरोदर महिलाहातकणंगले १५४शिरोळ ५६पन्हाळा १६करवीर १२चंदगड ०७गगनबावडा ०७कागल ०६शाहूवाडी ०६राधानगरी ०३एकूण २६७

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसfloodपूर