शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिली कोल्हापूरकरांना अनोखी भेट, पर्यटनवृद्धीसाठी जिल्ह्याला ३१ कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 11:16 IST

अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात

कोल्हापूर : कोल्हापूरची ऐतिहासिक माहिती पर्यटकांना व्हावी, पुरातन वास्तूंचे संवर्धन व्हावे यासाठी पर्यटनमंत्रीआदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना अनोखी भेट दिली असून, पर्यटन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पर्यटन वृद्धीसाठी ३१ कोटी ३१ लाख इतका निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासास चालना मिळणार आहे.

पर्यटन विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या निधीबद्दल लवकरच पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा जाहीर सत्कार करणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.रंकाळा तलाव, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन व ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र उभारण्यासाठी ४ कोटी ८० लाख, शहरात मल्टीपर्पज स्पोर्टस ग्राउंडसाठी ७५ लाख, ओपन जिम बसविण्यासाठी एक कोटी, विचारे माळ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर डिजिटल लायब्ररी व ग्रंथालयासाठी ५० लाख, कळंबा तलावाच्या सुशोभीकरण व संवर्धनासाठी ४ कोटी ५० लाख, पन्हाळागड येथे लाईट शो, साऊंड शो, लेजर शो यासाठी १२ कोटी, शाहुवाडी पावनखिंड समाधीस्थळाच्या विकासासाठी ३० लाख, कागल तालुक्यातील निढोरी गावातील महादेव मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकसाठी ३० लाख,कागल येथील विठ्ठल रखुमाई मंदिर रस्ता सुधारणासाठी १६ लाख, कागल तालुक्यातील पिराचीवाडी महादेव मंदिर व हनुमान मंदिर परिसरात महिला व पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र भक्त निवाससाठी एक कोटी ७५ लाख, चंदगड तालुक्यातील देवरवाडीतील वैजनाथ देवस्थान मंदिरासमोर सभामंडप बांधण्यासाठी एक कोटी ९५ लाख, कागल तालुक्यातील सुरपली गावात तलाव परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे, रिटेनिंग वॉलचे बांधकाम करणे, स्वागत कमान उभारणे व महादेव मंदिर परिसरात सुशोभीकरण, मंदिर परिसराला जोडणारे रस्ते, राऊंड गटर आणि सांस्कृतिक हॉल बांधण्याकरिता तीन कोटी ३० लाख यांचा त्यात समावेश आहे.

नवनवीन संकल्पना राबविण्यासाठी पाठपुरावा

अंबाबाई मंदिरासह जिल्ह्यातील विविध धार्मिक क्षेत्रे, गडकिल्ले, तलाव, अभयारण्य आदींना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. पर्यटकांना मूलभूत सोयी-सुविधा देणे, पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता नवनवीन संकल्पना राबविणे यासाठी पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना ३१ कोटी ३१ लाखांचा निधी मंजूर केला

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtourismपर्यटनAditya Thackreyआदित्य ठाकरेRajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर