गडहिंग्लजमध्ये ३०० किलो प्लॅस्टिक जप्त, पालिकेची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 15:35 IST2020-12-21T15:33:00+5:302020-12-21T15:35:06+5:30
Plastic ban, gadhingaljmuncipalty- गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात नगरपालिकेतर्फे प्लॅस्टिक बंदीची धडक मोहिम राबविण्यात आली. फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून सुमारे ३०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तीन व्यापाऱ्यांकडून ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गडहिंग्लज शहरात भरणाऱ्या आठवडा बाजारात धडक मोहिम राबवून पालिकेने ३०० किलो प्लॅस्टिक जप्त केले. यावेळी उपनगराध्यक्ष कोरी, आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड व कर्मचारी उपस्थित होते.
गडहिंग्लज :गडहिंग्लजच्या आठवडा बाजारात नगरपालिकेतर्फे प्लॅस्टिक बंदीची धडक मोहिम राबविण्यात आली. फळ विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून सुमारे ३०० किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. तीन व्यापाऱ्यांकडून ९०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.
आरोग्य समिती सभापती तथा उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी आठवडाभरात गडहिंग्लज शहर प्लॅस्टिकमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली असून त्यात ते स्वत: सहभागी झाले आहेत.
दसरा चौक, बसस्थानक परिसर, मेन रोड, बाजारपेठ, लक्ष्मी रोड, टिळक पथ, शिवाजी बँक परिसर याठिकाणी फळे आणि अन्य वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्या.
मोहिमेत उपनगराध्यक्ष कोरी, आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, मुकादम सुधीर कांबळे, अभिजीत झळके, संदीप बारामती, रामा लाखे यांच्यासह सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.