‘महास्वच्छता’ अभियानात ३६ टन कचरा उठाव, सलग २0 वी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:44 IST2019-09-09T14:42:14+5:302019-09-09T14:44:12+5:30
सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला.

‘महास्वच्छता’ अभियानात ३६ टन कचरा उठाव, सलग २0 वी मोहीम
कोल्हापूर : सलग विसाव्या रविवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. हे अभियान गणेशविसर्जन केलेल्या ठिकाणी राबविण्यात आले. यात शहरातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यात ३६ टन निर्माल्य आणि प्लास्टिक कचरा उठाव करण्यात आला.
यात पंचगंगा नदी परिसरातील आमदार संजयसिंह गायकवाड पुतळा चौक, राजाराम बंधारा, कसबा बावडा दत्त मंदिराजवळ, प्रायव्हेट हायस्कूल, जयंती नाला, कोटीतीर्थ तलावाजवळील नारायणदास महाराज मठ, राजाराम तलाव, सायबर चौक, राजाराम गार्डन, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, रंकाळा तांबट कमान, इराणी खण परिसर, या परिसरात रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, डी. डी. शिंदे सरकार महाविद्यालय, के. एम. सी. महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. यात चार जे. सी. बी. ४ डंपर, महापालिका २०० सफाई कर्मचाऱ्यांचे साहाय्याने ही मोहीम राबविण्यात आली. यात ३६ टन निर्माल्य व प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.
मोहिमेस महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, प्राचार्य पी. आर. शेवाळे, निखिल पाडळकर, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, दिलीप देसाई, अर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, आरोग्य निरीक्षक शुभांगी पोवार, आदी मान्यवर उपस्थित होते.