कोल्हापूर : पाटबंधारे विभागाने यंदा धरणातील पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केले आहे. गेल्या वर्षीचा अनुभव लक्षात घेता रब्बीच्या हंगामात राधानगरी, दूधगंगा, तुळशी धरणांतून ३.६४ टीएमसी (३६४३ दशलक्ष घनफूट) पाणी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.३१ टीएमसी पाण्याचा साठा अतिरिक्त आहे. आगामी तीन महिन्यांत पाण्याची गरज पाहता धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.पाऊस कमी झाल्याने गेल्या वर्षी पाण्याची मागणी वाढली होती. त्यामुळे मार्चअखेर धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला होता. त्यापुढील दोन-अडीच महिने पाणी पुरवणे पाटबंधारे विभागापुढे आव्हान होते. मात्र, यंदा परिस्थिती वेगळी आहे. पाऊस भरपूर झाला. त्यात परतीचा पाऊसही दणकून पडल्याने रब्बी हंगामाला अपेक्षित पाणी लागले नाही. रब्बी हंगामात ३.६४ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.धरणातही यंदा मुबलक पाणीसाठा आहे. राधानगरी, तुळशी, वारणा, कासारी, कडवी या धरणात गेल्या वर्षीपेक्षा ३.३१ टीएमसी पाणीसाठा अधिक शिल्लक आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा कोल्हापूरकरांना बसण्याची शक्यता कमी आहे.
रब्बीसाठी असे सोडले पाणी (दशलक्ष घनफूट)कालावधी - राधानगरी, दूधगंगा, तुळशीतून सोडलेले पाणीनोव्हेंबर ते फेब्रुवारी - ९८११ ते १७ मार्च - १५३७१८ मार्च ते ३ एप्रिल - ११२५
धरणातील तुलनात्मक पाणीसाठी (टीएमसी)-
धरण | सध्याचा साठा | गतवर्षी याच दिवसाचा साठा |
राधानगरी | ४.४७ | ३.५३ |
तुळशी | २.२० | १.९० |
वारणा | १३.५७ | ११.५६ |
दूधगंगा | ८.७३ | ९.०१ |
कासारी | १.६० | १.५८ |
कडवी | १.६२ | १.५८ |
कुंभी | १.६६ | १.८० |
पाटगाव | २.१० | २.१६ |