3 more arrested in Govind Pansare murder case; Will appear in Kolhapur court today | गोविंद पानसरे खून प्रकरणात आणखी 3 जणांना अटक; कोल्हापूर कोर्टात आज करणार हजर 
गोविंद पानसरे खून प्रकरणात आणखी 3 जणांना अटक; कोल्हापूर कोर्टात आज करणार हजर 

कोल्हापूर: ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे खून खटल्यातील आणखी तीन मारेकऱ्यांना आज पहाटे मुंबई, पुणे येथून अटक करण्यात आली. यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला सचिन अंदुरे या शार्प शूटरचा समावेश आहे. 
अंदुरे याला पुणे येथील जेलमधून तर अमित बद्दी आणि गणेश मिस्किन याला मुंबई येथील आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले.

आज सकाळी अकरा वाजता तिन्ही मारेकऱ्यांना कोल्हापूर येथील न्यायालयात हजर करण्यात येत आहे. अंदुरे, बद्दी व मिस्कीन यांना ताब्यात घेतल्यामुळे आतापर्यंत अटक झालेल्या आरोपीची संख्या बारा झाली आहे. कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीने याआधी संशयित शरद कळसकर याला अटक केली आहे.

कॉ. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये कोल्हापूरात गोळ्या झाडून हत्या केली. त्यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप सापडलेला नाही. त्याबाबत पानसरे कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाकडून तपास करण्यात येत आहे. 

Web Title: 3 more arrested in Govind Pansare murder case; Will appear in Kolhapur court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.